ETV Bharat / state

दिलासादायक! उपराजधानीतील रुग्णसंख्येत घट; तर मागील पाच दिवसात एकही मृत्यू नाही

नागपूर जिल्ह्यात बुधवारी आलेल्या अहवालात 8 हजार 201 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 74 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामध्ये शहरी भागात 43 तर ग्रामीण भागात 30 बाधित मिळून आले आहेत. तसेच 2 जण दगावले आहेत.

positive patients decreased in nagpur june 2021
उपराजधानीतील रुग्णसंख्येत घट
author img

By

Published : Jun 18, 2021, 7:05 AM IST

नागपूर -जिल्ह्यात कोरोनाबाधितांमध्ये घट होताना दिसत आहे. मात्र, रुग्णसंख्येसोबतच शहारासह ग्रामीण भागात मृत्युदर घटल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसात सातत्याने ग्रामीण भागातील मृत्युदर कमी होऊन पाच दिवसात एकही रुग्ण न दगावल्याची दिलासादायक बातमी समोर आली आहे. यासोबत रुग्णालयात केवळ 300च्या जवळपास रुग्ण उपचार घेत आहेत. या प्रकृती गंभीर असणाऱ्या रुग्णाची संख्या अल्प होत असल्याने दिलासा मिळाला आहे.

नागपूर जिल्ह्यात बुधवारी आलेल्या अहवालात 8 हजार 201 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 74 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामध्ये शहरी भागात 43 तर ग्रामीण भागात 30 बाधित मिळून आले आहेत. तसेच 2 जण दगावले आहेत. यामध्ये शहरी भागात 1, तर मागील पाच दिवसांपासून ग्रामीण भागात एकही रुग्ण मिळून आलेला नाही. तर जिल्ह्याबाहेरील 1 जण दगावले आहे. तेच 232 जणांपैकी शहरात 152 तर ग्रामीण 80 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यात 305 जण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. 871 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहे.

हेही वाचा - यमराजाच्या हातून काढून घेतला आईने काळजाचा तुकडा, डॉक्टरांनी केले होते मृत घोषित

9 हजारांहून अधिक मृत्यू -

आतापर्यंत सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन सध्या 1 हजार 336 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण 4 लाख 76 हजार 651 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातून 4 लाख 66 हजार 460 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 9015 बाधितांचा मृत्यू झाला आहे. नागपुरमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.86 टक्क्यांवर आहे. यात आणखी सुधारणा होत आहे.

सहा जिल्ह्यात 3 मृत्यू -

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 387 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 174 नवीन बधितांची नोंद झाली. तर यासोबतच तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या तुलनेत 213 अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. यात नागपूरचा रुग्णसंख्या दर 0.9 टक्के तर विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होत 0.95 टक्क्यांवर आला आहे.

हेही वाचा - शेतकरी चळवळीमध्ये दारू पिऊन तरूणाला जिवंत जाळण्यात आले, इतर शेतकरी सहकाऱ्यांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.