नागपूर - हैदराबाद येथे डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या या घटनेचा निषेध संबंध देशभर होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून समाजातील विविध घटक समोर येऊन या घटनेचा निषेध करत आहेत. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी नागपूर शिवसेना, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देत निषेध नोंदवला.
हेही वाचा - भारत माझा देश आहे म्हणायला लाज वाटतेय, बलात्कारप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टर तरुणी संतप्त
सध्या संपूर्ण देशात या घटनेच्याविरोधात तीव्र संताप असून जागोजागी आरोपींना फाशी देण्याची मागणी जोर धरत आहे. अशातच नागपुरात देखील आंदोलन करत आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना फाशीवर लटकवण्यात आले आणि पुतळे पेटवण्यात आले. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.