ETV Bharat / state

Raid On Hotel Cityscape: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, हॉटेल सिटीस्केपवर पोलिसांचा छापा - हॉटेल सिटीस्केपवर पोलिसांनी धाड

मसाज पार्लरच्या नावाने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश नागपुरात करण्यात आला आहे. शहर पोलीस विभागाच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कामगिरी केली. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉटेल सिटीस्केपवर पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ६ महिलांना ताब्यात घेतले असून त्यापैकी तीन पीडितांची सुटका करण्यात आली आहे.

Raid On Hotel Cityscape
सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
author img

By

Published : Aug 18, 2023, 6:54 PM IST

Updated : Aug 18, 2023, 7:40 PM IST

हॉटेल सिटीस्केपवर धाड प्रकरणी पोलिसांची प्रतिक्रिया

नागपूर : शहर पोलीस विभागाच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने सदर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या हॉटेल सिटीस्केप येथे आज (शुक्रवारी) छापा टाकला. तिथे मसाज पार्लरच्या नावाने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ६ महिलांना ताब्यात घेतले असून त्यापैकी तीन पीडितांची सुटका करण्यात आली आहे.

महिला 'या' भागातील रहिवासी : ज्या तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे त्यापैकी एक पश्चिम बंगाल, एक गोंदिया, दोन महिला उत्तर प्रदेश, दोन महिला नागपूर येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संपूर्ण कारवाई क्राईम ब्रँचने केली आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाला सदर येथील सिटीस्केप हॉटेलमध्ये स्पा, मसाज चालवण्याच्या नावाखाली काही महिला आणि मुलींकडून अवैध देहव्यवसाय करवून घेतला जात आहे, अशी माहिती मिळाली. याआधारे सुमारे चार दिवसांनी आरोपी हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी २ बोगस पंटरमार्फत सापळा रचून हॉटेलवर छापा टाकला. तेव्हा हॉटेलमध्ये दोन रूममध्ये दोन महिला सापडल्या. तसेच दोन पंचांसमक्ष हॉटेलची झडती घेतली असता किचन रूममध्ये चार महिला बंदिस्त केलेल्या मिळून आल्या.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात : सदर पोलिसांना यातील स्पा, मसाज पार्लर चालवणारी आरोपी महिलाही तेथे आढळून आली. पोलिसांनी तिच्याकडून बोगस पंटर मार्फत पाठविण्यात आलेल्या नोटा जप्त केल्या आहेत. याशिवाय तिच्यासोबत देहव्यवसाय करणाऱ्या महिलांवर लक्ष ठेवून त्यांच्याकडे ग्राहक पाठविणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कमलेश गजानन कटकमवाड आणि प्रदीपकुमार ठाकुर कुशवाह अशी त्यांची नावे आहेत.

चौघांविरुद्ध कारवाई : पोलिसांनी हॉटेलचे मालक ओम उर्फ अविनाश कदम यासह यातील स्पा चालवणाऱ्या महिलेसह एकूण ४ जणांवर कारवाई केली. सदर पोलीस ठाण्यात या चौघांवर कलम ३७०, ३४ भा.दं.वि. सहकलम ३, ४, ५, ६, ७ व ८ अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये एकूण 6 पीडित महिला व मुलींची सुटका करण्यात आली. यामध्ये नगदी ६१ हजार ३०० रुपये आणि मोबाईल फोनसह एकूण १ लाख २२ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा:

  1. हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश: ११ मुलींना अटक, सेक्स चॅटमध्ये अनेक प्रसिद्ध राजकारण्यांची नावे!
  2. ठाण्यात सेक्स रॅकेट चालवणारे तिघे गजाआड, दोन अभिनेत्रींची रवानगी सुधारगृहात
  3. ठाण्यात १ लाख ८० हजारात झाला होता सौदा, सेक्स रॅकेटमधील २ प्रसिद्ध अभिनेत्रींसह ५ जणांना अटक

Last Updated : Aug 18, 2023, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.