ETV Bharat / state

एटीएम फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील चौघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नागपूर जिल्ह्यातील मनसर येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरट्यांनी 19 लाखांची लंपास केली होती. पोलिसांनी ही रोकड लंपास करणाऱ्या चौैघांना अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

author img

By

Published : Oct 8, 2020, 8:45 PM IST

Updated : Oct 8, 2020, 9:51 PM IST

आरोपींसह पोलीस पथक
आरोपींसह पोलीस पथक

नागपूर - काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील मनसर येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरच्या मदतीने फोडून त्यातील 19 लाखांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात नागपूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अटक केलेली ही टोळी आंतरराज्यीय टोळी असल्याने टोळीतील चौघांना चेन्नईतून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून एका ट्रकसह 49 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

माहिती पोलीस अधीक्षक

नागपूर ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आलेले आरोपी कुख्यात चोर असून हे वेगवेगळ्या राज्यातील रहिवासी आहे. या आरोपींनी काही दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील मनसर येथील एटीएम गॅस कटरच्या साहायाने फोडून त्यातील 19 लाख रुपयांची रोकड लंपास केले होती. एवढेच नाही तर अशा प्रकारच्या अनेक घटना या आरोपींनी इतर ठिकाणीही केल्या आहेत. मनसर घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला तेव्हा चोरी करण्यासाठी आरोपींनी ट्रकचा उपयोग केल्याचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी ट्रकचा शोध सुरू केला. तेव्हा हा शोध चेन्नई येथे जाऊन संपला.

पोलिसांनी अत्यंत शिताफीने ट्रक चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी मनसर येथील एटीएममधील 9 लाख रुपयेही जप्त केले आहेत. त्यानंतर पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली असून आणखी दोघांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा - नागपूर विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षेला आजपासून सुरूवात

Last Updated : Oct 8, 2020, 9:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.