नागपूर : बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा अखेर मुहूर्त सापडला (Samriddhi Highway Inauguration) आहे. 11 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी ते समृद्धी महामार्गसह माझी मेट्रोचे दोन मार्गिकेचे उदघाटन करणार आहेत, अशी खात्रीलायक माहिती समोर आली असल्यामुळे प्रशासन कामाला लागले आहे. त्यानंतर जानेवारी महिन्यात नागपूर येथे आयोजित नॅशनल सायन्स काँग्रेसचे उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (PM Narendra Modi inaugurated Samriddhi Highway) होईल. त्यामुळे 25 दिवसात नरेंद्र दोन वेळा नागपूरचा दौरा करणार आहे.
समृद्धी मार्गाचे उद्घाटन : विदर्भाला समृद्धीची वाट दाखवणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होणार तरी कधी ? या एका प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राच्या सुजान जनतेला हवे होते. दर पंधरा दिवसांनी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची नवीन तारीख पे तारीख जाहीर केली जात होती. त्यामुळे जनतेला सुद्धा कंटाळा आला होता. गेल्या दोन वर्षात समृद्धी महामार्ग उदघाटनाची किमान १० वेळा तारखा जाहीर झाल्या. मात्र, आता 11 डिसेंबर ही नवी तारीख जाहीर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळाल्यानंतर समृद्धी मार्गाचे उद्घाटन होईल हे देखील स्पष्ट होत (PM inaugurated Samriddhi Highway on 11th December) आहे.
समृद्धी महामार्गाची माहिती : विदर्भाच्या सर्वांगीण विकासाला चालना देऊ शकण्याची क्षमता समृद्धीमध्ये आहे. २०१९ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर समृद्धीला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग, असे नवीन नाव देण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महामार्गासाठी जमीन खरेदीची प्रक्रिया डिसेंबर २०१४ मध्ये सुरू झाली होती. त्यानंतर डिसेंबर २०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन देखील (Modi inaugurated Samriddhi Highway and Metro) झाले.
रखडलेल्या मेट्रोचे उद्घाटन : समृद्धी महामार्ग उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल हे स्पष्ट झाले आहे. त्याचसोबत नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन देखील केले जाणार आहे. मेट्रोचे काम पूर्ण होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला असताना केवळ उदघाटनाच्या प्रतीक्षेमुळे मेट्रोची चाके थांबली आहे.