नागपूर - शहरातील कमलेश्वर परिसरात एका ५ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी एका ३२ वर्षीय तरुणावर अत्याचार करुन चिमकुलीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज नागपूरमध्ये लोकांनी निदर्शने केली.
या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तापास करत आहेत. कळमेश्वर तालुक्यातील लिंगा शिवारात पाच वर्षांच्या मुलीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडला आहे. ती गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. मृतदेह गावाबाहेरील शेतात आढळून आल्यानंतर या संदर्भांत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर कळमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.