ETV Bharat / state

नागपूर महापालिकेकडून जलपुनर्भरण प्रकल्प राबवण्याच्या सुचना; मात्र नागरिकांचे दुर्लक्ष

महापालिकेच्या आदेशानुसार काही नागरिकांनी जलपुनर्भरण प्रकल्प तयार केला आहे. मात्र, अर्ध्यापेक्षा अधिक नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे महापौर जिचकार म्हणाल्या.

जलपुनर्भरण प्रकल्प
author img

By

Published : Jun 26, 2019, 2:53 PM IST

नागपूर - भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. यावर मात करायची असल्यास प्रत्येकाने आपल्या घरी जल पुनर्भरण करण्याची गरज आहे. यासंबंधातील सुचना महापालिकेने नागरिकांना दिल्या असल्या तरी नागरिक याबाबतीत उदासीन असल्याचे दिसत आहे. त्यासाठी जनजागृतीची गरज असल्याचे महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.

जलपुनर्भरण प्रकल्पाबद्दल माहिती सांगताना महापौर नंदा जिचकार

सध्या राज्यात मान्सून दाखल झालेला आहे. मात्र, नद्या आणि धरणांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे पुढील वर्षी सुरळीत पाणीपुरवठा होईल याची शाश्वती नाही. शिवाय पावसाचे पाणी साठवण्याची कुठलीही सोय उपलब्ध नाही. त्यामुळे पावसाच्या पाणी नदी, नाल्यांना वाहून जात आहे. त्यामुळे या पाण्याचा काहीही उपयोग होती नाही. तसेच पाणी जमिनीत मुरत नसल्याने पाण्याच्या पातळीत घट होत आहे. त्यासाठी नागपूर महापालिकेने ३०० चौरस फूट बांधकाम असणाऱ्या घरांवर जल पुनर्भरण प्रकल्प राबवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यासाठी महापालिकेकडे पक्के धोरण नसल्याचे दिसते. त्यामुळे नागरिक उदासीन असल्याचे दिसते.

महापालिकेच्या आदेशानुसार काही नागरिकांनी जलपुनर्भरण प्रकल्प तयार केला आहे. मात्र, अर्ध्यापेक्षा अधिक नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे महापौर जिचकार म्हणाल्या.

Intro:भीषण पाणी टंचाईच्या झळा असह्य होत असताना आजच भाविष्यात निर्माण होणारी पाण्याची दाहकता ओळखण्याची गरज निर्माण झाली आहे...पाणी टंचाईवर मात करायची असल्यास प्रत्येकाने आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याची नितांत गरज आहे,मात्र या संदर्भात महानगर पालिका कडे पक्के धोरण नसल्याने नागरिकांमध्ये या विषया संदर्भात उदासीनता दिसून येत आहे

Body:उन्हाळा म्हणत की पाण्याची भीषण टंचाई ती आलीच,आजच्या घडीला मान्सून राज्यात दाखल झाला असला तरी नदी आणि धरणांची अवस्था फारच बिकट असल्याने पुढील वर्षी पाणी पुरवठा सुरळीत होईल याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही ...पावसाचे पाणी साठवण्याची कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने ते पाणी नाल्यात वाहून जात,ज्यामुळे पावसाच्या पाण्याचा काहीही उपयोग होत नाही....आज पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसल्याने पाण्याची पातळी प्रचंड खाली गेली आहे....कुठे कुठे तर पाण्याच्या पातळीच्या 500 ते 600 फुटांचा टप्पा गाठला आहे...या विषयावर लवकरच कोणत्या उपाय योजना केल्या नाही तर भविष्यात पाण्यासाठीच तिसरे महायुद्ध होईल अशी भीती आधीच व्यक्त करण्यात आलेली आहेच...तसं बघितले तर महानगर पालिकेने एक कायदा तयार करून रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या संदर्भात प्रत्येकाला सक्ती करायला हवी,मात्र महापालिके कडे या संदर्भात ठोस धोरणच नसल्याने आज नवीन बांधकाम होत असताना कुणीही पावसाचे पाणी जमीनीत मुरावे या करिता प्रयत्न करताना दिसत नाही आहेत....काही ठराविक नागरिक या संदर्भात जगरुक असले तरी मोठ्या प्रमाणात नागरिक या संदर्भात दुर्लक्ष करताहेत....महापालिकेने 300 चौरस फूट बांधकाम असणाऱ्या घरांना रेन वॉटर हार्वेस्टिंन करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत मात्र त्यापैकी निम्म्य घरांमध्ये हा प्रयोग करण्यात आलेला आहे....ज्यांनी महापालिकेच्या सुचनेकडे दुर्लक्ष केलेलं आहे अश्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी दिली आहे....नागपूर शहाराच्या विकासाची जबाबदारी ही महानगर पालिका आणि नागपूर सुधार प्रण्यास या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे कडे आहे,पण या दोन्ही संस्था या विषयाकडे फारसे लक्ष देत नसल्यानेच आज नागपुरातील नागरिक रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या महत्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष करत आहेत,आणि हेच दुर्लक्ष भविष्याच्या विध्वंसाचे करण ठरेल

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.