ETV Bharat / state

त्या' सर्व वऱ्हाड्यांची होणार कोरोना चाचणी; सहायक आयुक्तांचे लग्न समारंभ आयोजकाला नोटीस

author img

By

Published : May 8, 2021, 10:19 PM IST

मनपाने कोरोना नियमांची पायमल्ली करीत लग्न समारंभ आयोजित करणाऱ्या परिवारावर ५० हजार रुपयांची दंडात्मक केली होती. आता त्या लग्नात सहभागी सर्व वऱ्हाड्यांची कोरोना आरटीपीसीआर व अँटिजेन चाचणी मनपा करणार आहे.

participants of nagpur marriage party all members will be corona test
त्या' सर्व वऱ्हाड्यांची होणार कोरोना चाचणी; सतरंजीपुरा झोन सहायक आयुक्तांचे लग्न समारंभ आयोजकाला नोटीस

नागपूर - मनपाने कोरोना नियमांची पायमल्ली करीत लग्न समारंभ आयोजित करणाऱ्या परिवारावर ५० हजार रुपयांची दंडात्मक केली होती. आता त्या लग्नात सहभागी सर्व वऱ्हाड्यांची कोरोना आरटीपीसीआर व अँटिजेन चाचणी मनपा करणार आहे. मनपा आयुक्त बी. राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार यासंदर्भात सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त विजय हुमने यांनी लग्न समारंभ आयोजक राजेश समुंद्रे यांना नोटीस दिले आहे.

सोमवारी १० मे रोजी लग्न समारंभात उपस्थित सर्व वऱ्हाडी, शेजारी, पाहुणे या सर्वांची मनपाच्या मोबाईल चाचणी केंद्रावरून कोरोना चाचणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे नागपूर शहरातील ही पहिलीच कारवाई आहे. स्वीपर कॉलनी, सतरंजीपुरा झोन कार्यालयासमोरील रहिवासी राजेश समुंद्रे यांनी ५ मे २०२१ रोजी लग्न समारंभ आयोजित केला होता. परवानगी नसतानाही लग्न समारंभामध्ये १५० ते २०० लोक उपस्थित होते. याबाबत तातडीने दखल घेत मनपाच्या उपद्रव शोध पथकाने कारवाई करीत राजेश समुंद्रे यांचेकडून ५० हजार रुपये दंड वसूल केला होता.

शहरात कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने लग्न समारंभात सहभागी सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याचा मनपाने निर्णय घेतला. सोमवारी १० मे रोजी सकाळी ९ वाजता लग्न समारंभ आयोजकांच्या घराजवळ मनपाच्या मोबाईल चाचणी केंद्रावर सर्वांची आरटीपीसीआर व अँटिजेन चाचणी केली जाणार आहे.

शहरातील पहिलीच कारवाई
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लग्न समारंभांवर निर्बंध असताना देखील राजेश समुंद्रे यांनी ५ मे २०२१ रोजी लग्न समारंभ आयोजित केला होता. परवानगी नसतानाही लग्न समारंभामध्ये १५० ते २०० लोक उपस्थित होते. या सर्वांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अश्या प्रकारची होणारी ही पहिलीच कारवाई ठरणार आहे

हेही वाचा - ८० लाखांचा कर माफ करण्यासाठी तीन लाखांची लाच; दोघेजण एसीबीच्या जाळ्यात

हेही वाचा - नागपुरात बारावी पास झोलाछाप डॉक्टरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.