ETV Bharat / state

नागपूर : ट्रान्स्पोर्ट व्यसायिकांच्या प्रयत्नांमुळे ऑक्सिजन पुरवठ्याचा मार्ग सुकर

author img

By

Published : Apr 23, 2021, 4:46 PM IST

Updated : Apr 26, 2021, 7:47 PM IST

ऑक्सिजन टँकर अभावी परिस्थिती गंभीर झाली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्रान्स्पोर्ट व्यवसायिक यांच्या खांद्यावर जवाबदारी दिली. त्यांनी ऑक्सिजन कंटेनरची पहिली खेप नागपुरात पोहोचली आहे.

nagpur oxygen transport news
नागपूर : ट्रान्स्पोर्ट व्यसायिकांच्या प्रयत्नांमुळे ऑक्सिजन पुरवठ्याचा मार्ग सुकर

नागपूर - नागपूरात दररोज कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन टँकर अभावी परिस्थिती गंभीर झाली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्रान्स्पोर्ट व्यवसायिक यांच्या खांद्यावर जवाबदारी दिली. त्यांनी ऑक्सिजन कंटेनरची पहिली खेप नागपुरात पोहोचली आहे. त्यांमुळे हे टँकर शहराचा ऑक्सिजन पुरवठा नियमित करण्याच्या कामात जीवनदायी ठरणार आहे.

प्रतिक्रिया

ट्रान्स्पोर्ट व्यवसायिकांचे प्रयत्न मोलाचे -

ऑक्सिजनच्या साठ्यासाठी एक टँकर मिळत नसताना चक्क ट्रान्सपोर्ट व्यवसायिक या कठीण काळात प्यारे खान आणि वसीम खान यांनी विविध राज्यातून दहा टँकर मिळवले. या टँकरच्या सहाय्याने नागपूरची ऑक्सिजनची गरज भागणार आहे. मी ट्रान्सपोर्टर असल्यामुळे राष्ट्रीय संघटनेचा सदस्य आहे. मला त्यामुळे सर्वांची ओळख आहे. भारतभर कसे टँकर मिळू शकतील, यासाठी फोन लावले आणि १० टँकर उपलब्ध झाले असल्याचे प्यारे खान यांनी सांगितले. सद्यस्थितीत नागपूरमध्ये 150 टन ऑक्सिजनची गरज आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा २५ मेट्रिक टनने वाढू शकते. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या प्रयत्नाने भिलाई इथून ऑक्सिजन मिळण्याचे नियोजन झाले होते. आता टँकर उपलब्ध झाल्याने जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून वाटपाचे नियंत्रण प्रशासन करतील. यामुळे यात ट्रान्स्पोर्ट व्यवसायिकांचे प्रयत्न मोलाचे ठरले आहे.

हेही वाचा - 'ही काही नॅशनल न्यूज नाही'; राजेश टोपे यांचे बेजबाबदार विधान

Last Updated : Apr 26, 2021, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.