ETV Bharat / state

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; जाणून घ्या सविस्तर माहिती

राज्यातील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट म्हणून नागपूरकडे बघितले जात आहे. गेल्या मार्च महिन्यापासून नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महानगरपालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही, त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाचे पालन करण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Apr 10, 2021, 10:44 PM IST

नागपूर - राज्यातील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट म्हणून नागपूरकडे बघितले जात आहे. गेल्या मार्च महिन्यापासून नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महानगरपालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही, त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाचे पालन करण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.

हेही वाचा - कोरोना महामारीला हद्दपार करण्यासाठी व्यापक जनजागृती करा-सुनील केदार

राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे नागपूर जिल्ह्यात ४८ तासांचा लॉकडाऊन

नागपूर प्रमाणेच कोरोनाची भीषण परिस्थिती आता राज्यातील सर्वच जिल्ह्यात निर्माण झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशाप्रमाणे शनिवार आणि रविवारी उपराजधानी नागपुरात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यानुसार आज आणि उद्या शहरात बंद पाळण्यात येत आहे. ४८ तासांचा हा बंद असला तरी पुढील काळात तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाचे वेगळे निर्बंध नाही, राज्य सरकारचे सगळे निर्बंध लागू आहेत.

नागपूर जिल्ह्यातील कोरोना स्थिती

नागपूर शहराची आणि जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय भीषण झालेली आहे. शहरातील प्रत्येक भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे, रुग्णासंख्या झपाट्याने वाढत आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यात देखील आहे. नागपूर जिल्ह्यातील एकूण १४ तालुक्यांपैकी सावनेर, काटोल, हिंगणा कळमेश्वर आणि कामठी तालुक्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असल्याने हे तालुके डेंजर झोनमध्ये आलेले आहेत. तर, उर्वरित तालुक्यातसुद्धा रुग्णसंख्या वाढत आहे. दर दिवसाला सरासरी अडीच ते तीन हजार रुग्ण रोज बाधित होत असल्याने धोका वाढला आहे.

जिल्ह्यातील अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आणि मृत्यूची स्थिती

यावर्षीच्या सुरवातीलाच नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरवात झाली होती. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तर कोरोनाबाधितांच्या संख्येने प्रचंड वेग धरला होता. एप्रिल महिनाच्या सुरवातीला कोरोनाची रुग्णसंख्या हाताबाहेर गेली आहे. केवळ रुग्णसंख्याच नाही, तर मृत्यूचे आकडे देखील धक्कादायकरित्या वाढत आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ४९ हजार ३४७ सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये शहरात ३२ हजार ५९७, तर ग्रामीण भागात १६ हजार ७५० रुग्ण सक्रिय आहेत. गेल्या आठवड्यात हीच रुग्णसंख्या ३७ हजार इतकी होती, त्यामुळे आता रुग्णांना खासगी आणि शासकीय रुग्णालयात बेड्स मिळणेही कठीण झाले आहे. एप्रिल महिन्याच्या ९ दिवसांत नागपूर शहरात आणि जिल्ह्यात ४८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता नागपूरमध्ये ५ हजार ६४१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात मृत्यूचा दर २.४ इतका झाला आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण होण्याचा दर 22 ते 23 टक्के आहे.

जिल्ह्यातील रुग्णालय, बेड, आयसीयू, ऑक्सिजनची स्थिती

संपूर्ण नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाची अतिशय विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे. रुग्णसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने गंभीर झालेल्या रुग्णांना देखील बेड मिळत नसल्याची परिस्थिती आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयात एकूण ३ हजार ३१२ इतके ऑक्सिजन बेड आहेत, मात्र त्यापैकी केवळ १६५ बेड शिल्लक असले तरी ते अती गंभीर आणि गरोदर मातांसाठी आरक्षित असल्याने आता नवे बेड एकही शिल्लक नसल्याची परिस्थिती आहे. या शिवाय आयसीयू बेडची संख्या १ हजार ६२३ असली तरी शिल्लक मात्र ३१ आहेत. त्याचप्रमाणे व्हेंटिलेटर बेडची संख्या ५१५ आहे. मात्र, हे देखील केवळ ३ शिल्लक आहेत.

लॉकडाऊनच्या आधी आवश्यक समानांचे दर

मुळात लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याची सूचना आधीच मिळाली असल्याने नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक करायला सुरुवात केली होती. मात्र, बाजारांमध्ये होणारी गर्दी नियंत्रणात असल्याने जीवनावश्यक वस्तूंचे दर फारसे वधारले नाहीत. त्याचप्रमाणे फळांचे दर देखील स्थिर होते.

जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन

नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक झाला असला तरी महानगरपालिका प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनाने कुठेही हॉटस्पॉटची घोषणा केलेली नाही. २० पेक्षा जास्त रुग्ण एका भागात असेल तर त्याला मिनी कंटेंन्मेंट झोन घोषित केले जात आहे. ५ पेक्षा अधिक रुग्ण एका इमारतीमध्ये असल्यास ती इमारत मात्र सील केली जाते. शहरातील लक्ष्मी नगर, खामला, जरीपटका, इंदोरा, महालसारख्या गजबजलेल्या भागात मिनी कंटेन्मेंट आहेत.

काय सुरू काय बंद

राज्य सरकारने जाहीर केलेल्या दोन दिवसीय लॉकडाऊन दरम्यानच्या काळात अत्यावश्यक सेवा ज्यामध्ये रुग्णालय, औषधींची दुकाने, डोळ्यांचे दवाखाने, चष्म्याची दुकाने सुरू राहणार आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंटमधून सकाळी ७ ते रात्री ८ दरम्यान होम डीलिव्हरी मिळवता येईल. विमानाने, बसने आणि रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना घराबाहेर पडता येईल. तर, दुकानांमध्ये दारूविक्री होणार नाही. शहरातील खासगी कार्यालये पूर्णपणे बंद राहणार आहेत.

औषधींची स्थिती

नागपुरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा आता थेट कोविड सेंटरला होत आहे. त्यामुळे, काळाबाजारावर बऱ्यापैकी ब्रेक लागलेला आहे.
नागपूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे, खासगी रुग्णालयांमध्ये इंजेक्शनचा वापर अनियंत्रितपणे होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे, भविष्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने आता फार्मसीतून रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. इतर औषधी उपलब्ध आहेत.

स्मशान घाटावरील परिस्थिती

नागपूर शहरात आणि जिल्ह्यात साधारणपणे ५० ते ६० कोरोनाबाधितांचा मृत्यू दर दिवसाला होत आहे. शिवाय नैसर्गिक मृत्यू,अपघाती मृत्यू आणि विविध आजाराने होणाऱ्या मृत्यूंची संख्या देखील मोठी असल्याने स्मशानभूमीत मृतदेहांची प्रचंड गर्दी होते असली, तरी प्रत्येक भागात स्मशानभूमी असल्याने वेटिंगची परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. शहरातील मोक्षधाम, अंबाझरी आणि गंगाबाई घाटावर प्रत्येकी १० ते १५ मृतदेह जाळण्यासाठी ओटे असल्याने सध्यातरी सुरळीतपणे अंत्यसंस्काराची व्यवस्था होते आहे. शिवाय प्रत्येक धर्माची वेगळी व्यवस्था नागपुरात आहे.

हेही वाचा - सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण; खासगी रूग्णालयात उपचार सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.