ETV Bharat / state

Power Cut Off Vidarbha : विदर्भावर भारनियमनाचे संकट.. 'या' २०० फिडरची होणार 'बत्ती गुल'

विदर्भातील तापमान ( Vidarbha Heat Wave ) दिवसेंदिवस वाढत चालले असताना दुसरीकडे विजेची मागणीही वाढत ( Electricity Demand increased ) आहे. त्यातच आता विदर्भातील २०० फिडरवर भारनियमन ( Power Cut Off Vidarbha ) केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

author img

By

Published : Apr 13, 2022, 6:50 PM IST

विदर्भावर भारनियमनाचे संकट.. 'या' २०० फिडरची होणार 'बत्ती गुल'

नागपूर - विदर्भातील उन्हाळा आणि तापमानाच्या उच्चांकाची ख्याती सर्वत्र ( Vidarbha Heat Wave ) आहे. यातच यंदा सूर्य मार्च महिन्यातच आग ओकत असल्याने राज्याच्या इतिहासात प्रथमच विजेची मागणी तब्बल 28 हजार मेगावॅटचा घरात जाऊन ( Electricity Demand increased ) पोहचली. त्यामुळे आतापर्यंतचे मार्च महिन्यात सर्व उच्चांक विक्रम मोडीत काढले. त्यामुळे जी 1 जी 2, आणि जी 3 या वर्गवारीत मोडत असलेल्या सुमारे 200 फिडरवर काही तासांचे भरनियम केले जाणार असल्याची सूत्रांची माहिती ( Power Cut Off Vidarbha ) आहे. यात पूर्व विदर्भात कमी भारनियमन होणार असून, पश्चिम विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यात जास्त फिडर असल्याचेही सांगितले जात आहे.

विजेची तूट : मागील 15 दिवसात महावितरणची विजेची मागणी तब्बल 24 हजार 500 ते 24 हजार 800 मेगावॅटवर पोहोचली असून, तापमानाचा चढता पारा पाहता ही मागणी 25 हजार 500 मेगावॅटवर लवकरच जाईल, अशी स्थिती उद्भवत आहे. शेतकऱ्यांकडून सध्या विजेची मागणी वाढली आहे. यामुळे विजेची खरेदी आणि आर्थिक ताळमेळ साधण्यात महावितरणलाही घाम सुटत आहे. एकीकडे देशभरात कोळसा टंचाई निर्माण झाली असताना, काही दिवसांपासून महावितरणच्या औष्णिक वीजनिर्मितीत देखील घट झालेली आहे. तसेच देखभाल दुरुस्तीसाठी संच बंद असल्याने औष्णिक वीजनिर्मितीकडून तब्बल 6 हजार मेगावॅटने तूट निर्माण झाली आहे.

खुल्या बाजारात मागणी वाढल्याने विजेची टंचाई : थर्मल पॉवर कॉर्पोरेशनकडून गेल्या २८ मार्चपासून १५ जूनपर्यंत दररोज ६७३ मेगावॅट विजेचा पुरवठा सुरु झाला आहे. कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून (सीजीपीएल) ७६० मेगावॅट वीज खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. त्यापैकी ४१५ मेगावॅट वीज आजच्या मध्यरात्रीपासून उपलब्ध झालेली आहे. खुल्या बाजारात (पॉवर एक्सचेंज) विजेच्या खरेदीसाठी देशभरातून मागणी वाढल्याने प्रति युनिट वीज खरेदीचे दर महागले आहेत. परंतु जादा दर देण्याची तयारी असूनही खुल्या बाजारामध्ये खरेदीसाठी अपेक्षित प्रमाणात वीज उपलब्ध होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

काय आहे जी1, जी2, जी3 : राज्यातील ज्या भागात वीज चोरीचे प्रमाण जास्त आणि वीज बिलाच्या वसुलीचे प्रमाण कमी आहे DCL ( Distribution & Commercial Losses) त्यानुसार भारनियमनाचे गट निश्चित केले जातात. विदर्भातील 11 जिल्ह्यात सुमारे 1300 फिडर असून, यातील 200 फिडर हे जी 1 जी 2 आणि जी 3 या वर्गवारीत मोडतात. त्यामुळे याठिकाणी 2 तास भारनियम होणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. नागपूर परिमंडळात वर्धा आणि नागपूर जिल्हा येत असून, ७१२ फीडर आहेत. त्यापैकी जी-१, जी-२ व जी-३ या गटात १० फीडर आहेत.

हेही वाचा : महाराष्ट्र होणार घामाघूम.. ऐन उन्हाळ्यात कोळशाची टंचाई.. वीज निर्मिती ठप्प..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.