ETV Bharat / state

...सरकारने विदर्भ-मराठवाड्याच्या जनतेचा विश्वासघात केला - देवेंद्र फडणवीस - वैधानिक विकास महामंडळ

सरकारने वैधानिक विकास महामंडळ बंद करुन विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेचा विश्वासघात केल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते नागपुरात बोलत होते. तसेच हे अर्थसंकल्पीय अधिवेशन वीज बिलाच्या प्रश्नांसह अनेक मुद्यांच्या अनुषंगाने वादळी ठरणार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

devendra
विदर्भ मराठवाड्याच्या जनतेचा विश्वासघात केला - देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Feb 19, 2021, 12:45 PM IST

Updated : Feb 19, 2021, 2:13 PM IST

नागपूर - या सरकारने वैधानिक विकास महामंडळ बंद करत विदर्भ आणि मराठवाड्याचे पैसे पळविण्याचा मार्ग मोकळा केला आहे. आता तो पैसा थांबवू शकत नाही. पैसा पळवायला सुरुवात झाली आहे. येत्या काळात आणखी पैसा पळवताना दिसेल. याचाच अर्थ सरकारने वैधानिक विकास महामंडळ बंद करुन विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेचा विश्वासघात केल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते नागपुरात बोलत होते. तसेच हे अर्थसंकल्पीय अधिवेशन वीज बिलाच्या प्रश्नांसह अनेक मुद्यांच्या अनुषंगाने वादळी ठरणार असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.

देवेंद्र फडणवीस
राज्य सहकारी बँक घोटाळ्यात सहकार विभागाने अजित पवार यांना क्लीनचिट दिली आहे. यावर फडणवीस म्हणाले की, सहकार विभागाचा अहवाल आला आहे. त्याबद्दल फार माहिती नाही. पण जो अहवाल आला आहे, त्यावर आताच बोलणे योग्य होणार नाही. यामुळे न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर बोलणे योग्य राहील.

जनतेला मुर्ख बनविण्याचे काम-

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वीज बिल माफी करायला हवी अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. नाना पाटोले हे सत्तेत राहून विरोधी पक्षात असल्याची मजा घेत असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला. काँग्रेस सत्तेत आहे, सत्तेत राहून असे काही होत नाही. काँग्रेसच्या ऊर्जामंत्र्यांनी यावर ठोस निर्णय घ्यायला हवा. आत वेगळे बोलायचे आणि बाहेर वेगळे, असे बोलून सरकार जनतेला मूर्ख बनवण्याचे काम करत असल्याची टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली.

न्यायालयात उत्तर देऊ, पुरावे सादर करा-

अॅड असीम सरोदे यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी एकनाथ खडसेंना वाचविण्यात तुमचा हात होता आणि तुम्ही सुद्धा गुन्हेगार असल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना याचिकाकर्त्यांनी न्यायालयात तसे पुरावे सादर करावे. न्यायालयाने विचारल्यास त्यावर उत्तर देऊ असेही फडणवीस म्हणाले.

शिवजयंतीवरच निर्बंध का?

महाराष्ट्रात राजकीय पक्षांचे मेळावे जोरात घेतले जात आहेत. सत्तारूढ पक्षांचे मोर्चेही मोठ्या गर्दीत होत आहेत. मग शिवजयंतीवरच निर्बंध का आणले? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. आम्ही हिंदू म्हणून स्वतंत्र भारतात जगत आहोत. शिवरायांची जयंती आमच्यासाठी प्रेरणा आहे. त्यामुळे जन्मोत्सवावर निर्बंध चुकीचे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली पाहिजे. पण याची आठवण शिवजयंतीवेळीच का, मोठ्या पक्षांच्या मेळाव्याला का होऊ नये हा प्रश्न असल्याचेही ते म्हणाले. तसेच राज्यातील जनतेची वीज जोडणी कापली जात आहे. रयतेच्या राज्यात मोगलाई आली असल्याची टीका त्यांनी केली.

राज्यपाल हे 12 आमदारांच्या नियुक्तीवर बोलत नाहीत, पण अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल बोलतात, त्यावरून ते भाजपचे कार्यकर्ते आहेत असा आरोप केला जात आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे नियम वाचले नाहीत, संविधान वाचले नाही ते लोक अशा पद्धतीने भाष्य करत आहेत. संविधान वाचले असते तर त्यात स्पष्ट नियम केले आहेत. ज्यावेळी विधानसभा अध्यक्षपद हे रिकामे होते त्यावेळी तात्काळ नवीन अध्यक्षाची तारीख नेमून द्यावी, त्या तारखेला गुप्त मतदान पद्धतीने व्हावे, असेही फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.

Last Updated : Feb 19, 2021, 2:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.