नागपूर - शैक्षणिक क्षेत्रातील आरक्षण हे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नको, या मागणीसाठी खुल्या प्रवर्गातील लोकांनी आंदोलन केले. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला १६ टक्के तसेच आर्थिक मागास प्रवर्गासाठी १० टक्के आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे आरक्षणाची टक्केवारी ही ७८ टक्के झाली आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गासाठी केवळ २२ टक्के आरक्षण शिल्लक राहिले आहे.
वैद्यकीय प्रवेश परीक्षेत खुल्या प्रवर्गातून मोठ्या संख्येने विदयार्थी पात्र ठरले आहेत. मात्र, मराठा आणि आर्थिक मागास प्रवर्गाच्या आरक्षण खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. सरकारचा हा चुकीचा निर्णय असून, सरकारच्या या निर्णयाविरुद्ध खुल्या प्रवर्गातील लोकांनी सेव्ह मेरीट, सेव्ह नेशनचे नारे देत नागपूरात निदर्शन केली. शैक्षणिक आरक्षण हे ५० टक्क्यांच्या वर असू नये, अशी मागणी खुल्या प्रवर्गातील लोकांनी केली आहे.