नागपूर - पतंग उडवताना इमारतीवरून खाली पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दुसऱ्या एका घटनेमध्ये मांज्यामुळे गळा चिरून तरुणी गंभीर जखमी झाली. सादिक गुलाम नबी शेख (वय -35) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
हेही वाचा - दुधाच्या भुकटीवरील आयात शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव, अमूलने केला 'हा' आरोप
दुसऱ्या घटनेत सहयोग नगर भागात राहणारी चोवीस वर्षीय श्रध्दा शेंडे ही परीक्षा देऊन वाडी परिसरातून जात होती. रस्त्यात तिचा मांज्याने गळा कापला गेला. श्रध्दाच्या गळ्यातील दोन मुख्य रक्त वाहिन्या चिरत मांजा श्वासनलिकेपर्यंत पोहचला. यामुळे श्रद्धाच्या श्वसनावार परिणाम झाला असून आवाजात देखील बदल होऊ शकतो, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. नायलॉन मांज्यावर बंदी असताना देखील सर्रासपणे हा मांजा विकला जातो. त्यामुळे पतंग उडवणाऱ्यांची हौस ही लोकांच्या जीवावर बेतते.