नागपूर - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय विंग कमांडर यांना कुठल्याही परिस्थितीत भारताकडे सोपवावे लागणारच, असा दावा वायुसेनेच्या माजी अधिकारी शिवानी देशपांडे यांनी केला आहे. पाकिस्तानच्या विमानांना परतवून लावताना भारताचे मिग-21 हे लढाऊ विमान पाकिस्तानच्या सीमेत कोसळले. त्यानंतर विमानाचे चालक विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानी सैन्याने अटक केली आहे.
air force
जेनेवा कन्वेक्शननुसार पाकिस्तानला कुठल्याही परिस्थितीत विंग कमांडर अभिनंदन यांना भारताच्या स्वाधीन करावे लागणार, असा दावा वायुसेनेच्या माजी अधिकारी शिवानी देशपांडे यांनी केला आहे. पुढे त्या म्हणाल्या, की भारत आणि पाकिस्तान या दोन देशात युद्ध झाल्यास पाकिस्तान भारतीय सैन्यापुढे २ दिवसही टिकाव धरू शकणार नसल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
शिवानी देशपांडे यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधीने खास बातचीत करून भविष्यात उद्भवणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर काय-काय घडू शकेल आणि भारताकडे कुठले पर्याय खुले असतील यावर सविस्तर चर्चा केली.