ETV Bharat / state

लाॅकडाऊन : फळबाजारात शुकशुकाट.. फळविक्रेत्यांचे मोठे नुकसान

author img

By

Published : Apr 9, 2020, 4:42 PM IST

लाॅकडाऊनमुळे बागायतदारांना मजूर मिळणे कठीण झाले आहे. मिळालेच मजूर तर त्यांना ज्यादा पैसे द्वावे लागत आहेत. शिवाय फळे बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याच्या व्यवस्थेत अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. माल वाहतुकीस कुठलाही निर्बंध नाही. मात्र, बाजारपेठेपर्यंत जाण्यासाठी गाडीवाले मिळणे कठीण आहे. अशा परिस्थितीने फळांच्या किंमतीत चढ पहायला मिळतो आहे.

no-customer-in-fruit-market-due-to-lockdawn-in-nagpur
फळबाजारात शुकशुकाट....

नागपूर - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. त्यामुळे याचा फटका नागपुरातील फळ विक्रीला बसला आहे. शहरात महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समिती व संत्रा मार्केट हे प्रमुख फळ मार्केट आहेत. टाळेबंदीमुळे लोकांच्या घराबाहेर पडण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी फळ मार्केटकडे पाठ फिरवली आहे. शिवाय मागणी कमी झाल्याने मालाची उचल मोठ्या प्रमाणात घटली आहे.

फळबाजारात शुकशुकाट....

हेही वाचा- बारामतीतील 'त्या' कोरोनाबाधित व्यक्तीच्या दोन्ही नाती कोरोनाग्रस्त; शहरात एकूण संख्या 6वर

लाॅकडाऊनमुळे बागायतदारांना मजूर मिळणे कठीण झाले आहे. मिळालेच मजूर तर त्यांना ज्यादा पैसे द्वावे लागत आहेत. शिवाय फळे बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याच्या व्यवस्थेत अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. माल वाहतुकीस कुठलाही निर्बंध नाही. मात्र, बाजारपेठेपर्यंत जाण्यासाठी गाडीवाले मिळणे कठीण आहे. अशा परिस्थितीने फळांच्या किमतीत चढ पहायला मिळतो आहे. वाढत्या किमतीमुळे बाजारात ग्राहक फिरकेनासे झाले आहेत. शिवाय अनेक प्रकारच्या शंका-कुशंकामुळे ग्राहक फळ खरेदीस फारसे उत्सुक नाहीत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून फळांना थुंकी लावण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे काही ग्राहकांमध्ये फळ खरेदी करण्यावरून भीती पहायला मिळत आहे.

फळ विक्रेत्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एक विशिष्ट समाजाच्या फळ विक्रेत्यांपासून ग्राहकांनी अंतर राखणे पसंत केले आहे. त्यामुळे त्या समाजातील फळ विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने त्यांच्या समोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.