ETV Bharat / state

नागपूर जिल्ह्यातील ५९ गावांनी कोरोनाला रोखलं वेशीवरच - नागपूरच्या 59 गावांमध्ये नो कोरोना

शहरांसह ग्रामिण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे. पण, नागपूर जिल्ह्यातील 59 गावात अद्यापही कोरोना घुसला नाही. कारण या गावांनी कडक निर्बंध आणि उपाययोजनांद्वारे कोरोनाला गावाच्या वेशीवरच थोपावले आहे. अद्याप या गावातील एकालाही कोरोना झालेला नाही.

nagpur
नागपूर
author img

By

Published : May 30, 2021, 12:05 AM IST

नागपूर - सर्वत्र मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातील ५९ गावांनी कोरोनाला आपल्या गावात प्रवेश करू दिला नाही. या गावांमध्ये मागील वर्षीच्या मार्चपासून एकाही नागरिकाला कोरोनाची लागण झालेली नाही. गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून केलेल्या उपक्रमामुळे या गावात कोरोना पोहचू शकला नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

नागरिकांना आवाहन

'कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी व परिणाम उपाययोजने राबवल्या. त्यामुळे बाधितांची संख्या मर्यादित ठेवण्यात यश मिळाले. योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी कोरोना झाल्यानंतर बरे झालेल्या रुग्णांमध्ये काळी बुरशी सारखे आजार निदर्शनास येत आहेत. जनतेने अशा आजाराबद्दल तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामिण रुग्णालयात जाऊन तपासणी करावी', असे आवाहन योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

59 गावांचा सर्वांसमोर आदर्श

'जिल्ह्यातील १,६०५ गावांपैकी ५९ गावे कोरोनापासून दूर राहिली आहेत. या गावामध्ये मागील वर्षाच्या मार्चपासून एकही रुग्ण आढळलेला नाही. अथवा कोणीही बाधित झालेला नाही. कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करतानाच गावातील स्वच्छता, सोशल डिस्टन्स, मास्क घालण्याला प्राधान्य दिले जात आहे. इतर गावातून आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात आहे. कोरोनाला दूर ठेवणाऱ्या जिल्ह्यातील ५९ गावांचा सर्वांसमोर आदर्श आहे', असे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सागितले.

काटोल तालुक्यातील सर्वाधिक गावांचा समावेश

कोरोनाला दूर ठेवणाऱ्या गावांमध्ये काटोल तालुक्यातील सर्वाधिक ११ गावांचा समावेश आहे. त्याबरोबरच नागपूर तालुक्यातील 10 गावांनी कोरोनाला थोपविण्यात यश मिळविले आहे. हिंगणा तालुक्यातील ११९ गावांपैकी 7 गावात कोरोना आला नाही. कळमेश्वर तालुक्यातील ८६ गावांपैकी 3 गावे, भिवापूर तालुक्यातील १०६ गावांपैकी 2 गावे, कामठी तालुक्यातील ७८ गावांपैकी 2, मौदा तालुक्यातील १२४ गावांपैकी 6, नागपूर तालुक्यातील १३४ गावांपैकी 10, नरखेड तालुक्यातील ११८ गावांपैकी 4, पारशिवनी तालुक्यातील १०७ गावांपैकी 1, रामटेक तालुक्यातील १५२ गावांपैकी 8, सावनेर तालुक्यातील १३६ गावांपैकी 1 आणि उमरेड तालुक्यातील १३८ गावांपैकी 4 गावांनी कोरोनाला वेशीवरच थांबविले आहे.

हेही वाचा - अभिनेत्रीचा लस घेण्यासाठी कारनामा; फ्रंटलाईन वर्करचे खोटे ओळखपत्र बनवून घेतला डोस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.