नागपूर - राजकारणाच्या मैदानात भल्या भल्यांची आपल्या भाषणातून विकेट घेणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात गोलंदाजीचा आनंद घेतला. दोघांनी भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दीक पांड्याला गोलंदाजी करत उपस्थितांची मने जिंकली. नागपुरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप प्रसंगी दोन्ही नेत्यांनी क्रिकेटचा आनंद लुटला.
हेही वाचा - फडणवीसांचा अर्ज न्यायालयाने स्वीकारला, पुढील सुनावणी १० फेब्रुवारीला
खासदार क्रीडा महोत्सवाची शुक्रवारी नागपूरात सांगता झाली. या कार्यक्रमाला भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेडाळू हार्दीक पांड्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत. खासदार क्रीडा महोत्सवात विजयी ठरलेल्या खेळाडूंना पारितोषिक विरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर गडकरी आणि फडवीसांना हार्दिक पांड्या सोबत क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही.
हेही वाचा - राज ठाकरे यांनी आधी राजकीय भूमिका स्पष्ट करावी - गिरीश व्यास
गडकरी आणि फडणवीसांच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्याने जोरदार फटकेबाजी करत उपस्थितांची मने जिंकली. बॉलवर हार्दिक पांड्याची ऑटोग्राफ (सही) असल्याने हे बॉल थेट प्रेक्षकांमध्ये फटकावण्यात आले. सलग 12 दिवस चालणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सवा 39 हजार खेळाडूंनी सहभाग घेतला होता. 39 मैदानांवर 31 क्रीडा प्रकार खेळले गेले. या क्रीडा महोत्सवात खेळाडूंनी 7 हजार मेडल्ससह 78 लाख रुपयांची पारितोषिके जिंकली.