ETV Bharat / state

काँग्रेसने परदेशींना भारतात बोलावून मोठे केले; गडकरींचा गांधी कुटुंबावर निशाणा - नागपूर नागरिकत्व सुधारणा कायदा

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस देशाला फसवत असून मुस्लीम समाजाच्या मनात भिती निर्माण करत असल्याचे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे व्यक्त केले.

nitin gadakri on caa at nagpur
नितीन गडकरी
author img

By

Published : Dec 22, 2019, 1:01 PM IST

Updated : Dec 22, 2019, 1:59 PM IST

नागपूर - काँग्रेसने परदेशी लोकांना भारतात बोलावून त्यांना संसदेत पाठवले. त्यांना सत्तेत बसवले, परदेशी असतानाही देशात संपत्ती खरेदी करण्यास परवानगी दिली, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अप्रत्यक्षपणे गांधी कुटुंबावर निशाणा साधला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ लोक अधिकारी मंचच्यावतीने नागपूर येथील यशवंत स्टेडियम येथून आज (रविवारी) भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी नागपूर येथील कार्यक्रमात बोलताना

नितीन गडकरी यांच्या भाषणातील मुद्दे -

जैन, पारशी लोकांसाठी कोणते स्वंतत्र राष्ट्र नाही. रतन टाटांसारखे लोक पारशी आहेत. आमच्या धर्माने सर्वांचा स्वीकार केला. आम्ही जबरदस्तीने तलवारीच्या आधारावर कोणावर अत्याचार केला नाही. हा आमचा इतिहास आहे. आमच्या देशातील मुसलमान जेव्हा सौदीत जातात त्यांना मुस्लीम नाही तर त्यांना हिंदी (हिंदू) म्हणून ओळखले जाते. हिदूत्व आमचा आत्मा आहे. मुल्य़ाधिष्ठीत आचार विचार, परिवार पद्धती ही भारतीयांची ताकद आहे.

नागरित्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ नागपुरात मोर्चा

धर्माचा अर्थ कर्तव्यांशी जोडला जातो. पत्रकार ज्याप्रमाणे त्यांच्या पत्रकार धर्माचे पालन करतात. धर्माचा अर्थ म्हणजे कर्तव्य आहे. त्यामुळे काही लोक धर्मावरून चुकीचा प्रचार केला जात आहे. हिंदू असणे पाप आहे का? अफगानीस्तान व पाकिस्तानमध्ये हिंदूची संख्या का घटली? अनेक हिंदूचे धर्मांतर करण्यात आले. अनेक हिंदू महिलांवर अत्याचार झाले. त्यावेळी गांधीजींनी त्यांच्यावर अत्याचार होणार नाही. भारत त्यांना आश्रय देईल, असे सांगितले होते. त्या पीडितांना भारताने आश्रय दिला यात काय गैर आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधानाना मी आश्वासन दिले की, आपली संस्कृती एक आहे. चितगाव व मुगली हा जलमार्ग बनवला. बांगलादेशातही दहशतवादी आहेत. मात्र, तिथे अनेक अल्पसंख्यांक हिंदू आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहे. असे हिंदू गडचिरोली नागपूरमध्ये राहतात. आम्ही त्यांना नागरिकत्व दिले त्यात काय गैर आहे. असा सवाल गडकरी यांनी केला.

संविधानात बाबासाहेबांनी मुसलमानांचा 'रेफ्युजी' असा उल्लेख का केला नाही. कारण, ते मुस्लीम राष्ट्रात जाऊ शकतील असे त्यांचे मत होते. असेही गडकरी यावेळी बोलताना म्हणाले. गडकरी म्हणाले, "मी देशातील मुसमानांना आश्वस्त करतो की, आम्हाला कधी मुस्लिमांचा द्वेश करण्याचे शिकवण्यात आलेले नाही. मुस्लिमांना देशाबाहेर हाकलावे असे कधीच सांगितले नाही. आम्ही गरिबांना गॅस दिला. त्यात आम्ही मुस्लीमांना नाकारले का? प्रधानमंत्री आवास योजनेतून आम्ही मुस्लीमांना घरे दिले. काँग्रेस देशाला फसवत आहे, लोकांना खोटं सांगून कायद्याविरोधात वातावरण पेटवत आहे.

गडकरी म्हणाले, आम्ही समाजातून जातपात उखडून टाकणार आहोत. राममंदिरांची पहिली वीट एका दलित स्वयंसेवकाने ठेवली होती.

मताच्या राजकारणासाठी काँग्रसकडून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी नागपुरात निवडणूक लढवताना माझ्याबद्दलही असाच अपप्रचार करण्यात आला होता, असे गडकरी म्हणाले. तसेच ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आम्ही चालतो. त्यांनी कोणत्याही धर्माचा द्वेष केला नव्हता आम्हीही करत नाहीत.

गडकरी म्हणाले, अदनान सामी हे पाकिस्तानचे नागरिक होते. त्यांना भारताचे नागरिकत्व पाहिजे होते. आम्ही त्यांना भारतीयत्व दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सलमा आगा पाकिस्तानी कलाकारही आज मुंबईत राहते तिने धर्मातर केले होते. आम्ही त्यांनाही नागरिकत्व दिले आहे. त्यामुळे हा कायदा कोणत्या धर्माच्या विरोधात नाही.

राजकारणासाठी काँग्रेसकडून मुस्लिमांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले असल्याची टीकाही गडकरीनी यावेळी केली. त्यामुळे मुस्लिमांनी हे समजून घ्यावे, तुमचा विकास फक्त भाजपच करेल, तुम्ही या अपप्रचाराला बळी पडू नका. आम्ही तुमच्या नागरिकत्वाला कोणताही धक्का लागू देणार नाही, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

नागिरकांना संभ्रमित केले जात आहे. गरीब हा गरीब असतो त्यांना जात धर्म नसतो. त्यांचा विकास करणे आमचे ध्येय आहे. त्यामुळे पत्रकारांनी यावर लिखान करावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

Intro:Body:

A rally in support of  Citizenship Amendment Act (CAA) organized in Nagpur by Lok Adhikar Manch,BJP, RSS and other organizations.

Conclusion:
Last Updated : Dec 22, 2019, 1:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.