नागपूर - जिल्ह्यामध्ये 14 रुग्णांची सोमवारी भर पडली आहेय. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 300 च्या पुढे गेली असून, एकूण रुग्ण संख्या १ हजार ३१२ इतकी झाली आहे. सोमवारी पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने त्यांना प्रशासनाने आधीच क्वारंटाईन केले होते. या रुग्णांमध्ये सिम्बॉयसिस, व्हिएआयटी, हिंगणा क्वारंटाईन सेंटर येथील संशयितांचा समावेश आहे. तसेच काल दिवसभरात ४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
नागपुरातील एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९०३ वर स्थिरावली आहे. एकूण रुग्ण संख्या आणि डिस्चार्ज झालेल्या रुग्णांनी वजाबाकी केल्यानंतर ३८९ रुग्णांवर मेयो, मेडिकल, एम्स आणि मिलिटरी हॉस्पिटल कामठी येथे उपचार सुरू आहेत. सोमवारी एक अमरावती येथील रुग्णाचा उपचारादरम्यान मेडिकल येथे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपूरात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २० झाली आहे. महत्वाचे म्हणजे २० पैकी ६ रुग्ण नागपूर जिल्ह्याच्या बाहेरील आहेत.