नागपूर - गेल्या गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आज नागपूर शहरात पुन्हा १९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या नवीन रुग्णांसह जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ५४० वर पोहोचला आहे.
आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये दोन रुग्ण तांडापेठ, एक अकोला, एक सदर, सहा नाईक तलाव, सहा लोकमान्य नगर आणि ३ गोळीबार नगरचे आहेत. या सर्व रुग्णांना प्रशासनाने आधीच क्वारंटाईन केले असल्याची माहिती आहे. तर ३८० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या नागपूरात १४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये दोन डॉक्टरांचा देखील समावेश आहे. ते दोन्ही डॉक्टर विलागीकर कक्षात कर्तव्यावर होते.