ETV Bharat / state

नेपाळी तरुणीवर उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये बलात्कार, नागपुरात तक्रार दाखल

नेपाळी तरुणावर उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी नागपुरमधील कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

physical abused (symbolic)
बलात्कार (प्रतिकात्मक)
author img

By

Published : Oct 5, 2020, 10:25 PM IST

Updated : Oct 5, 2020, 10:55 PM IST

नागपूर - नेपाळ येथील तरुणीवर उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे बलात्कार झाल्याची तक्रार झाला. याप्रकरणी शहरातील कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. घटना ही उत्तर प्रदेशची आहे. मात्र, कोराडी पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

कोराडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वजीर शेख या प्रकरणाची माहिती देताना.

पीडित तरुणी 2018मध्ये कामाच्या शोधात नेपाळवरून दिल्लीला आली होती. तिथे तिने एका इव्हेंट कंपनीमध्ये काम केले. त्याचदरम्यान तिची ओळख दुसऱ्या सुफी विश्वकर्मा नावाच्या नेपाळी तरुणीशी झाली. यानंतर त्या दोघेही गुजरात राज्यातील सुरत येथे गेल्या. तेथे काही वेळ काम केल्यानंतर 2019मध्ये त्या दोघीही उत्तर प्रदेशमध्ये गेल्या. तिथे सोफियाने तिच्या भाऊ प्रवीण यादवसोबत पीडितेची भेट घालून दिली. तो दुबई येथे कामाला आहे. त्याने या नेपाली युवतीला लग्नाचे आमिष देऊन तिच्याशी अनैतिक संबंध स्थापित केले. तसेच त्याचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली. यानंतरही अनेकदा तिच्यावर बलात्कार केला.

या परिस्थितीमध्ये युवती घाबरलेल्या अवस्थेत नागपूरमध्ये आपल्या मैत्रिणीकडे आली आणि तिला आपली आपबिती सांगितली. यानंतर तिच्या मैत्रिणीने धाडस दाखवत कोराडी पोलीस स्टेशन गाठले. यावेळी पोलिसांना सगळी माहिती दिली. त्यावरून कोराडी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. प्रकरण लखनऊ येथील असल्याने पुढील तपास लखनऊला होणार आहे.

Last Updated : Oct 5, 2020, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.