ETV Bharat / state

Neelam Gorhe On Winter Session सीमा वासियांसोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा असल्याचा ठराव विधिमंडळात करावा - नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागावरुन ( Karnataka Maharashtra Border Dispute ) दोन्ही राज्यात वाद सुरू आहे. या वादावर महाराष्ट्र सीमाभागातील ( Resolution On Maharashtra Karnataka Dispute ) नागरिकांसोबत उभा असल्याचा ठराव विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात ( Winter Session ) मांडण्यात यावा अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी आज नागपुरात केली. कर्नाटकची मनमानी रोखण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही सूचना स्विकारली असल्याचेही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे ( Legislative Council Deputy Speaker Neelam Gorhe ) यावेळी म्हणाल्या.

Deputy Speaker Neelam Gorhe
नीलम गोऱ्हे विधान परिषदेच्या उपसभापती
author img

By

Published : Dec 17, 2022, 3:46 PM IST

नागपूर - सीमा वासियांसोबत ( Karnataka Maharashtra Border Dispute ) संपूर्ण महाराष्ट्र उभा असल्याचा एक ठराव विधिमंडळात ( Nagpur Winter Session ) सर्व संमतीने करावा अशी विनंती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी त्यांनी कर्नाटकची जी मनमानी सुरू आहे, त्याबद्दलही अधिवेशनात चर्चा व्हावी. तिथला अविकसित भाग विकसित करण्यासाठी काय केले पाहिजे, याचाही विचार त्या ठरावात व्हावा अशी मागणीही नीलम गोऱ्हे यांनी ( Neelam Gorhe Statement On Winter Session ) नागपुरात केली आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारली सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सूचना स्वीकारली असून कर्नाटक आणि सीमा ( Karnataka Maharashtra Border Dispute ) प्रश्र्नाबद्दल शासन एक ठराव मांडणार आहे. लोकप्रतिनिधींनी ही विविध आयुधाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले तर नक्कीच चर्चा होऊ शकते, असे देखील निलम गोऱ्हे ( Neelam Gorhe Statement On Winter Session )या आज नागपुरात म्हणाल्या आहेत.

अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी - अधिवेशनाचे कालावधिबद्दल कामकाज सल्लागार समितीमध्ये चर्चा झाली आहे. काही सदस्यांनी ४ ते ५ जानेवारीपर्यंत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू ठेवा अशी मागणी केली होती. मात्र सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात सर्वानुमते कालावधी ठरविण्यात आलेला आहे. त्यामुळे मी भाष्य करणे योग्य नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जास्तीत जास्त कामकाज व्हावे - मिळालेल्या कालावधीचा योग्य वापर करणे हे जास्त महत्त्वाचे असून कोणीही गोंधळ करायचा आहे, म्हणून करत नाही. पुरेशी उत्तर मिळत नाहीत, असे विरोधी पक्षाला वाटते तेव्हा गोंधळ होतो. तर काही वेळेला विरोधी पक्ष चर्चा वेगळ्याच वळणावर नेत आहे, असे सत्ताधाऱ्यांना वाटते, तेव्हा गोंधळ होतो. गोंधळ झाले तरी मार्ग काढण्याची तयारी आपण ठेवतो. अधिवेशनात जास्तीत जास्त कामकाज व्हावे अशी भूमिका सर्व पक्ष ठेवतील अशी माझी अपेक्षा असल्याचेही नीलम गोऱ्हे यांनी ( Neelam Gorhe Statement On Winter Session ) यावेळी स्पष्ट केले.

विद्यापीठ खंडणी प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप करावा - नागपूर विद्यापीठात प्राध्यापकांकडून खंडणी वसुलीचे प्रकरण ( Nagpur University Extortion Case ) अत्यंत गंभीर आहे. तुमच्या विरोधात तक्रार आली आहे, असे सांगून कोणीतरी व्यक्ती प्राध्यापकाकडून पैसे घेते हे गंभीर आहे. ज्यांनी पैसे दिले त्या प्राध्यापकांनी त्यांच्या विरोधात खरोखर तक्रार आली आहे, का याची माहिती कुलगुरू किंवा प्रकुलगुरूकडे विचारणा का केली नाही? आपण चुकीचे काहीच केलेले नाही मग आपल्या विरोधात तक्रार होऊच नाही शकत असा विचार पैसे देणाऱ्या प्राध्यापकांनी का केला नाही? त्यांनी पैसे का दिले? त्यामुळे कुलगुरूंना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागालाही सूचना दिल्याचेही त्यांनी यावळी सांगितले. या प्राध्यापकांनी मुळात कोणत्या गोष्टीला घाबरून पैसे दिले याची चौकशी केली पाहिजे. पोलिसांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशी सूचना मी करणार आहे. त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक ( Meeting With Nagpur Police Officer ) घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.