ETV Bharat / state

शरद पवार पुन्हा दौऱ्यावर... विदर्भातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी साधला संवाद

प्रशासनाच्यावतीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे विदर्भात सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यात राजकारणी व्यग्र आहेत. अशा परिस्थितीत शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी शरद पवार पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी शरद पवारांनी साधला संवाद
author img

By

Published : Nov 14, 2019, 12:41 PM IST

Updated : Nov 14, 2019, 4:44 PM IST

नागपूर - परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपूर विमानतळावर स्थानिक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून पवार यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांनी पिकाची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी शरद पवारांनी साधला संवाद

हेही वाचा -राज्यातील सत्तासंघर्षात विदर्भ वेगळा करून मुख्यमंत्री द्या - राम नेवले

प्रशासनाच्यावतीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे विदर्भात सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यात राजकारणी व्यग्र आहेत. अशा परिस्थितीत शेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी शरद पवार पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. पीक पाहणीचा कार्यक्रम झाल्यानंतर १५ नोव्हेंबरला पवार नागपूर येथील मेकोसाबाग शाळेच्या मैदानावरील बिरसामुंडा जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

Intro:काल पाठवलेल्या बातमीतुन बातमी करून घ्यावी,मी काटोल साठी निघालो आहेBody:काल पाठवलेल्या बातमीतुन बातमी करून घ्यावी,मी काटोल साठी निघालो आहेConclusion:
Last Updated : Nov 14, 2019, 4:44 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.