ETV Bharat / state

राष्ट्रीय रक्तदान दिवस : बाळकृष्ण महाजनांचे आजवर 109 वेळा रक्तदान, जीवनात 150 वेळा रक्तदान करण्याचा मानस

आज राष्ट्रीय रक्तदान दिवस आहे. यानिमित्ताने आपण जीवात जीव आहे तोपर्यंत 150 वेळा रक्तदान करण्याचा निश्चय असणाऱ्या अवलियाची गाथा वाचणार आहोत. त्यांनी आतापर्यंत 109 वेळा रक्तदान केलं आहे. शिवाय ते नवीन लोकांनाही रक्तदानासाठी प्रोत्साहित करतात. डॉ. बाळकृष्ण महाजन असं त्यांचं नाव आहे.

बाळकृष्ण महाजन
बाळकृष्ण महाजन
author img

By

Published : Oct 1, 2021, 8:11 AM IST

नागपूर : रक्तदानाचं महत्व सर्वांना कळावं या उद्देशाने १९७५ पासून ०१ ऑक्टोबर हा दिवस आपल्या देशात 'राष्ट्रीय रक्तदान दिवस' म्हणून साजरा केला जातो. कुणाचाही जीव वाचवण्यासाठी रक्तदान करणे किती महत्वाचे आहे, या बाबतचे महत्वाचे आता सर्वांनाच पटल्याने स्वेइच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची मोठी फळीच आपल्या देशात उभी झाली आहे. असं म्हणतात की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे अनेक रक्तदाते मोठ्या संख्येने पुढे येऊन रक्तदान करत आहेत. अनेकांच्या तोंडातून ऐकलं असेल की १० वेळा रक्तदान केलं, ५० वेळा रक्तदान केलं. मात्र नागपुरात राहणारे ५९ वर्षीय डॉक्टरेट बाळकृष्ण महाजन यांनी तब्बल 109 वेळा रक्तदान करून मोठा आदर्श निर्माण केला आहे. वयाच्या ६५ वर्षापर्यंत रक्तदान करता येते. त्यामुळे किमान १२५ वेळा रक्तदान करण्याची बाळकृष्ण यांची इच्छा आहे. प्रकृतीने साथ दिल्यास १५० वेळा रक्तदान करण्याचा त्यांनी निश्चिय केला आहे.

राष्ट्रीय रक्तदान दिवस

रक्तदान करण्याचं आवाहन

कुणालाही रक्ताची गरज असल्यास सदैव तत्पर असलेले डॉक्टर महाजन गरजूनां मदत म्हणून रक्तदान तर करतातच. मात्र दर तीन महिन्याला रक्तदान करण्याचा नित्यक्रम त्यांनी गेल्या ४२ वर्षांपासून जोपासला हे विशेष. डॉ बाळकृष्ण महाजन हे आज ५९ वर्षांचे आहेत. पुढच्या महिन्यात ते सेवानिवृत्त होणार आहेत. निवृत्तीनंतर तरुणांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. किमान वर्षभरात एकदा तरी प्रत्येकाने रक्तदान केलेच पाहिजे, असं आवाहन देखील ते करत आहेत.

अपघातग्रस्तांना रक्तदान केल्याने मिळाली प्रेरणा

१९७८ साली बालकृष्ण महाजन हे महाविद्यालयात असताना त्यांनी एनसीसीच्या नेवल बॅचमध्ये प्रवेश मिळवला होता. त्याकरिता शूटिंगचा सराव करण्यासाठी जात असताना वाटेत एक कार अपघातग्रस्त झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यावेळी जखमींना रक्ताची गरज होती. एनसीसीच्या सरांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्वात पहिल्यांदा बाळकृष्ण महाजन यांनी रक्तदान केलं, ज्यामुळे काही लोकांचे जीव वाचले होते. त्यानंतर त्या जखमींना रुग्णालयातुन सुट्टी मिळाल्यानंतर त्यांनी आम्हाला सन्मानित केले, ज्यामुळे मला रक्तदान करण्याची प्रेरणा मिळाली होती. त्यावेळी मिळालेलं समाधान आजही रक्तदान करताना मिळत असल्याचं महाजन सांगतात.

गरजुंसाठी रक्तदान करायला सदैव तयार

डॉ. बाळकृष्ण महाजन यांनी अनेक किस्से सांगितले. ज्यांना रक्ताची नितांत गरज भासली होती. रक्तदान केल्यानंतर त्या रुग्णांचा जीव वाचला यापेक्षा दुसरे मोठे सुख मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. आपला देश कोरोनाच्या संकटात अडकला होता. त्यावेळी देखील देशात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. मात्र स्वेइच्छेने रक्तदान करणाऱ्यांनी हा तुटवडा भरून काढल्याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचं ते म्हणाले.

हेही वाचा - Breaking : डॉक्टरांचा आजपासून बेमुदत संप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.