ETV Bharat / state

नागपुरात नाना पटोलेंनी मंत्र्याची बाजू सावरत विरोधकांना लगावला टोला - नागपूर नाना पटोले

मुख्यमंत्री यांनी घेतलेले निर्णयात बदल करावा त्यांना अधिकार आहेत. मागील सरकारमध्ये सुपर मुख्यमंत्री कोण होते ते सर्वानी पाहिले आहे. कोविडच्या परिस्थितीचे नियंत्रण आणि रोजगार निर्माण होतील, असे दोन्ही प्रश्न सोडवले जाईल असा निर्णय होईल,असे नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले
नाना पटोले
author img

By

Published : Jun 4, 2021, 10:48 PM IST

नागपूर - मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची बाजू सांभाळत ते त्या खात्याचे मंत्री असल्याने अनलॉक होऊ शकते म्हणून ते बोलले. मात्र मुख्यमंत्री हे सरकारचे प्रमुख असतात. यामुळे मंत्र्यांनी केलेल्या घोषणेसोबत वेगळ्या घोषणा करणार आहोत हे मुख्यमंत्र्यांचे अधिकार असे म्हणत बाजू सावरून घेण्याचे काम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले. ते नागपूर विमानतळावर बोलत होते.

'मागील सरकारमध्ये सुपर मुख्यमंत्री कोण होते ते पाहिले आहे'

यावेळी नाना पटोले म्हणाले, की भाजपाची सरकार असतांना त्यांच्यातही ताळमेळ नव्हता. सध्याच्या परिस्थितीत लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. शिवाय लोकांमध्ये मरणाची आणि दुसरी रोजगाराची भीती आहे. या परिस्थितीत चांगला मार्ग निघावा ही सरकारची भूमिका आहे. यात लवकरच मुख्यमंत्री निर्णय घेतील. केंद्रातील मोदी सरकारप्रमाणे तुमचे तुम्ही पाहा असे नाही, महामारी स्वत: आणायची आणि दूर राहायचे, अशी टीकाही नानांनी केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वयाने कामकाज सुरू असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री यांनी घेतलेले निर्णयात बदल करावा त्यांना अधिकार आहेत. मागील सरकारमध्ये सुपर मुख्यमंत्री कोण होते ते सर्वांनी पाहिले आहे. कोविडच्या परिस्थितीचे नियंत्रण आणि रोजगार निर्माण होतील, असे दोन्ही प्रश्न सोडवले जाईल असा निर्णय होईल, असे नाना पटोले म्हणाले. शिवा संजय राऊत यांनी राष्ट्रवादीवर राग काढला आहे. संभाजी राजे, शाहू, फुले, आंबेडकर अशी वेगळी आघाडी निर्माण करण्याचे काम राज्यात होत आहे का? यावर बोलताना नाना म्हणाले, की लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे. ज्यांना वाटते तसे ते करू शकतात. पण सध्या यावर वक्तव्य करणे बरोबर नाही, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा-'अनलॉक'वरून विरोधकांच्या हातात आयते कोलीत; तर काँग्रेसकडून सारवासारव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.