ETV Bharat / state

Nana Patole On Government : ईडीच्या भरवश्यावर सत्तेत आलेल्या सरकारला जागे करण्याचे काम सुरू - नाना पाटोले - Nana Patole On Government

काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसाचा दौरा करत त्याचा अहवाल राज्याचे सचिव मुख्यमंत्री आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांना देणार आहेत. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टिका केली. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

Nana Patole
नाना पाटोले
author img

By

Published : Jul 29, 2022, 1:22 PM IST

Updated : Jul 29, 2022, 1:43 PM IST

नागपूर - काँग्रेसचे नेते हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसून धीर देण्याचे काम करत आहे. पण राज्यात ईडीच्या भरवश्यावर आलेले सरकार झोपी गेले आहे. मोदी सरकारच्या आशीर्वादामुळे लोकशाहीत अमान्य असलेले हे सरकार महाराष्ट्रात आल्याची टीका त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी केली. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. ते शुक्रवार पासून विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत ( Nana Patole In Vidarbha ).

जनता उपाशी सरकार तूपाशी - राज्यातली जनता ही वाऱ्यावर असताना केंद्रातील मोदी सरकार ( Modi government ) हे तुपाशी असल्याची परिस्थिती देशात निर्माण झाली. विदर्भात मोठ्या प्रमाणात झालेल्या शेती नुकसानीचा आढावा घेऊन दोन दिवसाचा दौरा करत याचा अहवाल राज्याचे सचिव मुख्यमंत्री आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांना देणार आहे. एकीकडे या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आत्महत्या ( Farmers commit suicide )होत आहे, हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही, त्यामुळे झोपी गेलेल्या सरकार्ला जाग करण्याचे काम दौऱ्याच्या माध्यमातून केले जात आहे.

मंत्रिमंडळ विस्तार - एक महिना लोटूनही सरकार स्थापन झालेले नाही तारीख पे तारीख देत दिल्लीवारी केली जात आहे. दिल्लीच्या सरकारच्या दबावाखाली येऊन सरकार स्थापन झालेले आहे. पण दोन्ही पक्षाचे आमदार सांभाळता येत नाही, त्यामुळे सरकार केव्हा पडेल मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही आहे. भीतीमुळे यात सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन सरकार पडेल अशी भीती भाजपला असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.

असंविधानीक पद्धतीने हे सरकार अपंग - सरकार पूर्ण होण्यासाठी घटनेच्या कलम 146/1 क प्रमाणे कमीत कमी बारा जणांचे मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची गरज असते, ज्या पद्धतीने हे असंविधानीक पद्धतिमे अपंगत्वाने चालत आहे, त्यामुळे त्यांना थट्टा करायला नाही तर घटनेप्रमाणे हे सरकार चालत नसल्याने अपंग सरकार म्हटलं आहे. हा त्यातील महत्वाचा मुद्दा आहे. आमदार खासदार यांची बोली लावून ब्लॅकमेल केले जात आहे, हे महाराष्ट्रात होत आहे यापूर्वी कधीही झालेले नाही. आंबेडकरांची कर्मभूमी असलेल्या पुरोगामी महाराष्ट्राची ओळख असतांना संविधानिक व्यवस्था तोडून पुरोगामी ओळख पुसण्याचे काम केले जात आहे.

जातीच्या आधारे राजकारण सुरू - काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्याकडून राष्ट्रपती यांच्याबद्दल चुकून तो शब्द निघाला आणि त्यासाठी माफी मागितली आहे. राष्ट्रपती हे पद राष्ट्राच्या प्रमुखाचे पद आहे. राष्ट्रपती बद्दल अशा पद्धतीचे वक्तव्य होऊ नये हे आम्ही मान्य केले आहे. पण राष्ट्रपती पद हे जाती धर्माचा नसून सर्वोच्च पद आहे. पण भाजप जातीचा आधार घेऊन ज्या पद्धतीने राजकारण करते आहे हे सुद्धा तेवढेच घातक आहे. पण जीएसटी आणि मूळ मुद्द्याला सोडून सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झाले. त्यापासून पळ काढण्याचे काम आणि लुटण्याचे काम करत आहे.

शेतकऱ्यांना एकरी 50 हजारांची मदत - राज्यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. बागातदार शेतकऱ्यांना एक लाख रुपये एकरी आणि जिरायती शेतकऱ्यांना एकरी 50 हजाराची मदत तातडीने जाहीर करण्याची मागणी केली आहे. पण महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या करत असतांना महाराष्ट्रातील भाजप सरकार हे दिल्लीवारीत लागलेले आहे.

आर्थिक राजधानी मुंबईला कमजोर करण्याचे प्रयत्न - गुजरातच्या माध्यमातून मुंबईला आर्थिक कमजोर करून पोखरण्याचे काम होत आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सुरत मुंबई बुलेट ट्रेनला मान्यता दिली आहे. यातून आर्थिक राजधानी मुंबईला कमजोर करण्याचे काम गुजरात मधून चालले आहे, हा अनेक वर्षांचा प्रयत्न आहे पण आता ईडीच्या भरवश्यावर आलेले सरकार हे काम करत आहे. घटनेच्या शेड्युल 10 प्रमाणे हे सरकार कधी पडू शकते, संविधानिक व्यवस्थेचा आधार घेऊन सरकार जास्त दिवस टिकणार नाही.

हेही वाचा - World Tiger Day : जागतिक व्याघ्रदिन विशेष! 'वाघांच्या जिल्ह्यात' तब्बल अडीचशे वाघांचा मुक्तसंचार

Last Updated : Jul 29, 2022, 1:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.