नागपूर Nana Patole On Baton Charge Jalna : काल काँग्रेसच्या मुंबई येथील कार्यालयात राहुल गांधी यांचं भाषण सुरू झालं होतं. (Maratha protesters baton charged) दर्जेदार व दिशादर्शक भाषण जनतेत जाऊ नये यासाठी म्हणून मराठा समाजावर नियोजनबद्ध पद्धतीने लाठीचार्ज करण्यात आला. (Rahul Gandhi Speech) राहुल गांधी यांचं भाषण टीव्ही मीडियातून बाहेर व्हावे यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. (Home Minister Fadnavis Ordered Baton Charge)
फडणवीसांनीच आरक्षणाचे गाजर दाखविले : हे सुलतानी सरकार जनतेसाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. राज्यात लोकशाहीचं खच्चीकरण सुरू असल्याचं देखील ते म्हणाले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीचं मराठा, धनगर समाजाला आरक्षणाचं गाजर दाखवलेलं होतं. त्यांना कोणतेही अधिकार नसताना त्यांनी मराठा समाजाला आश्वासन दिल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आज मुद्दाम लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
मराठा आणि ओबीसीत भांडण लावण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते की मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ. आता ते राज्यकर्ते मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचं काम करत असल्याचा आरोप केला आहे. सरकारने राजीनामा द्यावा, माफी मागावी असं ते म्हणाले आहेत. आधी ईडी सरकार होतं आता अजित पवार यांची साथ मिळाल्याने आता हे येड्याचं सरकार आहे असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की, २४ तासात आरक्षण मिळवून देतो. आज दीड वर्षे झाली आहेत. चोराच्या उलट्या बोंबा अशी परिस्थिती भाजपची आहे.
काँग्रेस न्याय देणार-पटोले : मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष भूमिका घेईल. प्रत्येक घटकाला ताकद देण्याचं काम काँग्रेस करेल, असं आश्वासन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे. कुणाच्या हिश्शातून कुणाला आरक्षण काढून देण्याची गरज नसल्याचं ते म्हणाले आहेत. खोटं बोलून सत्ता मिळवलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा संकल्प जनतेने आता घेतला आहे. लाठीचार्ज करणारे पोलीस तुमचे आणि लाठीचार्जसुद्धा तुमच्या आदेशाने झाला आणि आम्ही राजकारण करतो आहे, हे म्हणणं चुकीचं असल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत.
सत्तेसाठी भाजपा काहीही करू शकतो : सत्तेत राहण्यासाठी भाजपा काहीही करू शकतो. पुलवामाची घटना भाजपाने केली हे सत्यपाल मलिक यांनीच सांगितलं आहे. काँग्रेस पक्ष हा आगीत तेल टाकण्याचं काम करत नाही ही पद्धत भाजपाची आहे, याची अनेक उदाहरण देता येतील. मणिपूर अजूनही शांत झालं नाही. पेटलेलंच आहे. विशेष अधिवेशन घेण्यामागील कारण माहीत नाही. जुमलेबाज लोकांचा काही नेम नाही. आधी लोकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी प्रश्न, बेरोजगारी, महागाई, गरिबी यावर हे सरकार बोलायला तयार नाही. पण नवनवीन करामती करुन लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी काम सुरू आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
वन नेशन वन इलेक्शनचे समर्थन : वन नेशन वन इलेक्शनचं समर्थन करण्यासाठी काहीही अडचण नाही. परंतु निवडणुका फेअर पद्धती झाल्या पाहिजे. ज्या वोटिंग मशीनवर सर्वांना संशय आहे आधी त्या मशिन्स बाजूला कराव्यात आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
हेही वाचा: