ETV Bharat / state

Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरी धमकी प्रकरणी नागपूरच्या विशेष न्यायालयाने एनआयएचा अर्ज फेटाळला - The court rejected the NIA application

नितीन गडकरी यांच्या धमकीप्रकरणी नागपूर विशेष न्यायालयाने एनआयएचा अर्ज फेटाळला आहे. एनआयएला दोन्ही प्रकरणे नागपुरातून मुंबईत हलवायची असतील, तर उच्च न्यायालयात जावे, असे निर्देश नागपूरच्या विशेष न्यायालयाने एनआयएला दिले आहेत.

Nitin Gadkari Threat Case
Nitin Gadkari Threat Case
author img

By

Published : Jul 18, 2023, 3:27 PM IST

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकी तसेच खंडणी प्रकरणाचा तपास करण्याची परवानगी मिळाली होती. याकरिता राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कडून नागपूर विशेष न्यायालयात एक अर्ज दाखल करण्यात आला होता. आज या अर्जावर सुनावणी झाली असून न्यायालयाने एनआयएचा अर्ज फेटाळला आहे.

उच्च न्यायालयात जावे : एनआयएला दोन्ही खटले नागपूर येथून मुंबईला हस्तांतरित करायचे असतील, तर उच्च न्यायालयात जावे असे, आदेश नागपूरच्या विशेष कोर्टाने एनआयएला दिले आहेत. शहरातील धंतोली पोलीस ठाण्यात नोंदवलेली दोन प्रकरणे मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात वर्ग करण्यास जिल्हा न्यायालयाने नकार दिला. धंतोली ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यांबाबत नागपूर न्यायालयाचे स्थानिक अधिकार आहेत असे देखील म्हटले आहे.

नागपूर पोलिसांनी दिले ना हरकत प्रमाणपत्र : नितीन गडकरी यांना मिळालेल्या धमकी आणि खंडणी प्रकरणात दहशतवादी कनेक्शन समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपावण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. याला नागपूर पोलिसांची परवानगी आहे. म्हणून नागपूर पोलिसांनी ना हरकत प्रमाणपत्र दिल्याची माहिती नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यास पुढील काही दिवसात हा तपास एनआयएकडे वर्ग होईल असे देखील ते म्हणाले आहेत.

अफसर पाशाचे नागपूर कनेक्शन : नागपूर पोलिसांकडून अफसर पाशाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याने धक्कादायक खुलासे करण्यास सुरुवात केली आहे. अफसर पाशाचे नागपूर कनेक्शन देखील चौकशी दरम्यान उघड झाले आहे. तो २००३-२००४ मध्ये तो नागपुरात वास्तव्याला होता. चौकशी दरम्यान तो वारंवार उत्तरे बदलत असल्याची माहिती पुढे आली आहे. एनआयएचे पथक देखील त्याची चौकशी करणार असल्याची शक्यता असून १९ जुलैपर्यंत अफसर पाशाला पोलीस कोठडी मिळाली आहे.

अफसर पाशावर बॉम्बस्फोटाचे आरोप : अफसर पाशा लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी असून २०१४ पासून बेळगावच्या तुरुंगात कैदेत होता. बेळगावच्या तुरुंगातच त्याने जयेश पुजारी उर्फ शाकीरचे ब्रेनवॉश करत त्याचा दहशतवादी नेटवर्कसाठी वापर करून घेतला होता. अफसर पाशावर २००३ च्या ढाका, २००५ च्या बेंगलूरु बॉम्ब ब्लास्टचा आरोप आहे. अफसर पाशाने जयेशला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून खंडणी मागण्यासाठी प्रवृत्त केले होते.

वर्षाच्या सुरुवातीला दोनवेळा दिली धमकी : या वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात बेळगाव कारागृहातून जयेश पुजारीने दोनदा धमकीचे फोन करून खंडणी मागितली होती. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी दोन गुन्हे नागपुरात दाखल केले आहेत. तर या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यावर एनआयएने बेंगळूरू येथे एक गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता दहशतवादी अफसर पाशाचे नाव पुढे आल्याने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

'पीएफआय'च्या संपर्कात होता जयेश : जयेश पुजारी उर्फ शाकीरचे संबंध दहशतवादी संघटनांसोबत असल्याने नागपूर पोलिसांनी त्याच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तो पीएफआय नॅशनल एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलचा सचिव मोहम्मद अफसर पाशाच्या संपर्कात आला होता. त्यांनीच जयेशचा ब्रेन वॉश केल्याचे तपासात पुढे आले आहे.

हेही वाचा - Nitin Gadkari Threat Case: नितीन गडकरी धमकी प्रकरणात चौकशी दरम्यान अफसर पाशाच्या छातीत दुखू लागले, उपचार सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.