नागपूर - नागपुरात कोरोनाची परिस्थिती काहीशी सुधारणा वाटत असल्याचे चित्र असतांना बुधवारी आलेल्या अहवालात पुन्हा 85 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. मागील लाटेच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यूची नोंद एप्रिल महिन्यात झाली आहे. या परिस्थितीत मागील दोन दिवसात काहीसा बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेले अधिक रुग्ण असतांना आज पुन्हा 7 हजार 503 बाधितांची भर पडली आहे.
नागपूर जिल्ह्यात 26 हजार 525 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात शहरात 4 हजार 803 तर ग्रामीणमध्ये 2 हजार 690 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तेच मृत्यूचे प्रमाण पाहता 85 जण दगावले आहे. ग्रामीण भागात 38 जणांचा मृत्यू असून शहरात 37 जणांचा मृत्यूची नोंद असून बाहेर जिल्ह्यातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आतापर्यंत शहरात 7 हजार 204 बाधित दगावले आहेत. आतापर्यंत 3 लाख 9 हजार 233 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 12 हजार 172 बाधितांची भर पडली असून 12 हजार 82 जण हे कोरोनामुक्त झाले आहे. तेच आजच्या अहवालात भंडार जिल्ह्यात 1 हजार 283, चंद्रपूर 1 हजार 224, गोंदिया 469, वर्धा 1 हजार 098, गडचिरोली 595 जण हे बाधीत मिळून आले आहेत. यासह पूर्व विदर्भात 179 जणांचा मृत्यूची नोंद झाली असून 4 लाख 60 हजार 102 जणांनी कोरोनावर मात केलेली आहे.
हेही वाचा - नागपुरात २५ वर्षीय महिला डॉक्टरवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, सहकारी डॉक्टरला बेड्या
हेही वाचा - नागपुरी पॅटर्न : कुख्यात गुंड रणजित सफेलकरची संपत्ती तोडायला सुरुवात