ETV Bharat / state

RSS मुख्यालय, नागपूर विमानतळाजवळ ड्रोन उड्डाण करण्यास बंदी

RSS Nagpur Airport Drone Ban : RSS मुख्यालय तसंच नागपूर विमानतळाजवळ ड्रोन उड्डाण करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. हिवळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.

Rashtriya Swayamsevak Sangh
Rashtriya Swayamsevak Sangh
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 3:23 PM IST

RSS मुख्यालय ड्रोन उड्डाण करण्यास बंदी

नागपूर RSS Nagpur Airport Drone Ban : नागपूर पोलिसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय तसंच नागपूर विमानतळा जवळच्या परिसरात ड्रोन उड्डाणावर बंदी घातली आहे. हा आदेश पुढील दोन महिन्यांसाठी नागपूर पोलिसांनी वाढवला आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 7 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर हा आदेश महत्वाचा आहे.

ड्रोन उड्डाणावर बंदी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय तसंच नागपूर विमानतळाची सुरक्षा लक्षात घेता, पोलिसांनी ड्रोन उड्डाणावर बंदी घातली आहे. बंदीच्या मागील आदेशाची मुदत संपल्यानंतर नागपूर पोलिसांनी पुढील दोन महिन्यांसाठी बंदीचा आदेश वाढवला आहे, अशी माहिती नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

2021 पासून लागू आहे बंदी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसचे मुख्यालय नागपूर येथील महाल भागात आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी आरएसएस कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्याचवेळी नो ड्रोन फ्लायचा हा आदेश देण्यात आला होता. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘नो ड्रोन’ झोन घोषित केलं जाणार आहे.

दहशतवाद्याला केली होती अटक : नागपूर येथील संघाच्या मुख्यालयाची रेकी करणाऱ्या एका संशयित दहशतवाद्याला गेल्या वर्षी एटीएसच्या पथकानं जम्मू काश्मीरमधून अटक केली होती. रईस अहमद असदुल्ला शेख असं या संशयित दहशतवाद्याचं नाव आहे. रईस जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचं तपासात समोर आलं आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी आरोपीला जानेवारीत दुसर्‍या प्रकरणात अटक केली होती. रईस अहमदला नागपूर एटीएसनं प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतले होतं. त्यानंतर एटीएमच्या पथकानं त्याला नागपुरात चौकशीसाठी आणलं होतं. दहशतवादी रईस अहमद असदुल्ला शेख यानं जुलै 2021मध्ये नागपुरातील हेगडेवार स्मृती भवन परिसरसह इतर महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती.

2006 ला आरएसएसच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ला : जून 2006 च्या पहाटे चार वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला होता. लाल दिवा असलेल्या कारनं दहशतवादी आरएसएस मुख्यालयाच्या दिशेने आले होते. सुरक्षा बंदोबस्तात तैनात सैनिकांनी गाडी थांबवण्याचा इशारा दिला, पण ती गाडी थांबली नाही. त्यानंतर ती कार आरएसएस मुख्यालयापासून काहीचं अंतरावर मीटर थांबली. कारमध्ये 20 ते 22 वर्षे वयोगटातील 3 मुलं होती. त्यांच्या जवळ शस्त्र होती. सुरक्षा रक्षकांनी त्यांना खाली उतरण्यास सांगितलं पण, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करत गोळीबार सुरू केला होता. या चकमकीत पोलिसांनी कारमधील तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तेव्हा पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कायम सुरक्षेच्या घेऱ्यात असतं

हेही वाचा -

  1. 'जो महापुरूषांची जात काढतो त्याच्याबद्ल बोलायचं नाही', जरांगेंची भुजबळांवर अप्रत्यक्ष टीका
  2. विनायक काळे 'बॅक टू पॅव्हेलीयन'; मॅटच्या निर्णयानंतर ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. काळे यांची पुन्हा नियुक्ती
  3. आजही मुलींना आपलं करिअर निवडण्यासाठी संघर्ष करावा लागतो- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.