नागपूर - नागपूर करारानुसार नागपूरसह संपूर्ण विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला होता. त्या नागपूर कराराची विदर्भवाद्यांनी होळी केली ( Nagpur pact burnt by Vidarbha activists )आहे. नागपूर कराराला ६९ वर्ष पूर्ण झाली ( 69 years of Nagpur pact ) आहेत. २८ सप्टेंबर १९५३ साली हा नागपूर करार करण्यात आला होता. मात्र, या ६९ वर्षात कधीही राज्यकर्त्यांनी नागपूर कराराचे पालन केले नाही असा आरोप विदर्भवाद्यांनी केला आहे. आज नागपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नागपूर कराराच्या प्रती जाळण्यात आल्या आहेत. राज्यकर्त्यांकडून विदर्भावर सातत्याने अन्यायाची भूमिका घेतली जाते. त्यामुळेच वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरत असल्याचे देखील विदर्भवाद्यांनी सांगितले आहे.
दोन्ही पक्षांकडून विदर्भाचा छळ - काँग्रेस, भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांनी विदर्भाचा छळ केलेला आहे. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा केवळ राजकारण आणि सत्ताकारणाकरता वापरला असल्याचा आरोप विदर्भवाद्यांनी केला ( Vidarbha activist Alleged not followed Nagpur pact ) आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी ही 116 वर्ष जुनी आहे. मात्र त्यानंतर झारखंड, छत्तीसगड, उत्तरांचल सारख्या राज्यांची निर्मिती झाली. मात्र,वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडे राज्यकर्ते सोईस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विदर्भवादांकडून करण्यात आला ( Demand For Separate Vidarbha ) आहे.
काय आहे नागपूर करार - २८ सप्टेंबर १९५३ साली हा नागपूर करार करण्यात आला होता. या करारानुसार मुंबई राज्य, मध्य प्रदेश राज्य आणि हैदराबाद राज्याच्या मराठी भाषी भागातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. 29 डिसेंबर 1953 रोजी फैझलअली अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता. त्यानंतर भारत सरकारने प्रथम राज्य पुनर्गठण आयोग नेमले होते. या आयोगाचे इतर सदस्य हृदयनाथ कुंजरू, के.एम पण्णीकर, माधव श्रीहरी आणि ब्रिजलाल बियाणी हे होते. या नेत्यांनी राज्य पुनर्गठन आयोगाला एक निवेदन दिलं त्यामध्ये नागपूर राजधानी असलेले वेगळे विदर्भ राज्याचा अनग्रह करण्यात आला होता.