नागपूर - नागपूर महापालिका क्षेत्रात येणाऱ्या गांधीबाग, नेहरूनगर सारख्या जुन्या वस्त्यांमध्ये असलेल्या अनेक इमारती हे धोकादायक असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. यामध्ये 170 पेक्षा जास्त इमारतींचा धोकादायक यादीत समावेश असून 97 इमारती या गांधीबाग परिसरात आहे. 50 च्या घरात नेहरूनगर परिसरात आहे. या इमारती राहण्यास योग्य नसल्या तरी आजही लोक जीव धोक्यात घालून वास्तव्यास करत आहेत.
'या' इमारतीत दोनशे कुटुंब राहतात
नागपूर शहरातील मॉडर्न मिल चाळ ही सर्वात जुनी चाळ असून जीर्ण झाली आहे. यात मजुरांची तिसरी पिढी राहत आहे. मॉडेल मिलच्या जागेवर आज टोलेजंग फ्लॅट सिस्टीम उभी राहिली असली तरी याच इमराती समोर असणारी ही चाळ शेवटच्या घटका मोजत आहे. जुन्या पद्धतीने बांधणी असलेली ही इमारत पाहून कोणी राहत असेल यावर विश्वास बसणार नाही. पण, दुसरा पर्याय नसल्याने याच ठिकाणी सुमारे दोनशे कुटुंब वास्तव्यास आहेत.
यातील अनेक इमरातीची प्रकरण काही वादामुळे न्यायलयात आहे. यातील काही इमारती धारकांना महापालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर नोटीस बजावली आहे. नागपूर महापालिकेकडून याबाबत एक सर्वेक्षण करण्यात यावेळी तब्बल 60 वर्षे जुन्या व 30 वर्षे जुन्या अशा 20 हजारांच्या घरात इमारती असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा - सोनेगाव येथील तरुणीच्या हत्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थी याचिका