ETV Bharat / state

'कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणायची असेल तर नागरिकांनी जीवनशैली बदलावी'

शासनाकडून कठोर पावले उचलली जाण्याची वाट न बघता नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरजच भासणार नसल्याची भूमिका मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतली आहे. कोरोनाचा सामना यशस्वीरित्या करायचा असेल तर नागरिकांनी जीवनशैली देखील बदल करण्याची गरज निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

आयुक्त तुकाराम मुंढे
आयुक्त तुकाराम मुंढे
author img

By

Published : Aug 7, 2020, 6:10 PM IST

नागपूर - शहरात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची टक्केवारी झपाट्याने वाढत आहे. शिवाय रुग्णसंख्या दहा हजारांच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना पुन्हा लॉकडाऊन लावला जाणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली तर कोरोनाला हरवणे शक्य आहे. त्याकरिता नागरिकांनी आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज असल्याचे मत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले आहे.

'कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणायची असेल तर नागरिकांनी जीवनशैली बदलावी'

गेल्या महिनाभरापासून नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांनी सुमारे पाच हजारांचा आकडा पार केला आहे. यामुळे एकूण आकडा साडे सात हजारांवर पोहोचला आहे. दर दिवसाला पाचशे ते सातशे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होते आहे. शिवाय मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे. कोविड-19 संदर्भांत शासनाने घालून दिलेले निर्देशांचे पालन होत नसल्याने परिस्थिती भीषण रूप धारण करत आहे. शासनाकडून कठोर पावले उचलली जाण्याची वाट न बघता नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरजच भासणार नसल्याची भूमिका मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतली आहे. कोरोनाचा सामना यशस्वीरित्या करायचा असेल तर नागरिकांनी जीवनशैली देखील बदल करण्याची गरज निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.