ETV Bharat / state

नागपुरातील 33 ठिकाणी मनसेने परवानगी मागितली; तर पाहणी करूनच पोलीस परवानगी देणार

author img

By

Published : May 4, 2022, 3:30 PM IST

आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी एका ठिकाणी परवानगी देण्यासंदर्भात विनंती केली. यावर सोनेगाव येथील हनुमान मंदिरासाठी मनसेकडून अर्ज केला जाणार आहे. त्या स्थळाची संपूर्ण पाहणी करून त्यानंतर परवानगी दिली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पोलीस-मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक
पोलीस-मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक

नागपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर नागपुरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हनुमान चालीसा पठनासाठी पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली होती. शहरातील 33 ठिकाणी पठनाची परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी एका ठिकाणी परवानगी देण्यासंदर्भात विनंती केली. यावर सोनेगाव येथील हनुमान मंदिरासाठी मनसेकडून अर्ज केला जाणार आहे. त्या स्थळाची संपूर्ण पाहणी करून त्यानंतर परवानगी दिली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

नागपुरातील 33 ठिकाणी मनसेने परवानगी मागितली

त्यानंतरच परवानगी - हनुमान जयंतीच्या दिवशी नागपुरात सोनेगाव येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंतीदिनी हनुमान चालीसा पठण करण्यात आले होते. या हनुमान मंदिरातच आज भोंगा लावून हनुमान चालीसा पठण करण्याची परवानगी मनसेकडून मागण्यात येणार आहे. पोलीस त्या जागेची पाहणी करून कुठलीही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, याची चाचपणी करणार आहे. त्यानंतरच भोंगा लावण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

33 ठिकाणी मनसेने परवानगी मागितली
33 ठिकाणी मनसेने परवानगी मागितली

ठिकठिकाणी पेट्रोलिंग - शहरातील पोलीस विभागातील सर्व अधिकार्‍यांची बैठक घेऊन शहरात कायदा व सुव्यवस्था आबाधित राहिल आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. त्याचा आढावा अधिकाऱ्यांचा बैठकीत घेण्यात आला अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. तसेच शहरात ठिकठिकाणी पेट्रोलिंग सुरु आहे. यामध्ये शहरातील 300 पेक्षा जास्त मशिदी आणि 1200 पेक्षा जास्त मंदिरांवर नजर ठेवून कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिस यंत्रणा सातत्याने प्रयत्न करत असल्याचेही पोलीस आयुक्त यांनी सांगितले.

हेही वाचा - Raj Thackeray PC :...तोपर्यंत हनुमान चालीसा चालूच राहणार; 135 मशिदींवर कारवाई का नाही? राज ठाकरेंचा सवाल

मनसे पदाधिकाऱ्यांना प्रतिक्षा - आम्ही कायद्यानेच कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करण्याची परवानगी पोलीस विभागाकडे मागितली आहे. यासाठी सकाळपासूनच मनसेचे पदाधिकारी आपल्या भागात परवानगी मिळावी यासाठी पोलिसांना पत्र देऊन रीतसर प्रक्रिया करत असल्याचे सुद्धा हेमंत गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे पोलिस कायद्याच्या चौकटीत राहून परवानगी देणार का याची प्रतीक्षा मनसेचे पदाधिकारी करत आहे. नागपूर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी मनसेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली असल्याचे सुद्धा माहिती समोर येत आहे. या साधारण पंधरा ते वीस पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.