नागपूर - गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी महामेट्रोच्या उप-महाव्यवस्थापकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. उप-महाव्यवस्थापक बृजेश दीक्षित, विश्वरंजन बवेरा आणि प्रवीण समर्थ अशी अटक झालेल्यांची नावे असून त्यांच्यावर माहिती आणि तंत्रज्ञान(आयटी) कायद्याअंतर्गत कारवाई झाली आहे. महामेट्रोमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचे प्रकरण समोर आल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्या आवाजात क्लिपिंग तयार करून गोपनीय डाटा आणि कागदपत्रे लीक करण्याचे प्रकरण पुढे आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार बनावट दस्ताऐवजाच्या मदतीने बवेरा यांनी नोकरी मिळवली, या प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते. बवेरा यांची चौकशी सुरू असतानाच त्यांनी समर्थ नावाच्या ऑपरेटरला हाताशी धरून चौकशी कुठपर्यंत आली याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बृजेश दीक्षित दररोज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महामेट्रोच्या संचालकांसोबत बोलत होते. त्या सवांदाची रेकॉर्डिंग करून प्रवीण समर्थ ती क्लिप बवेरा यांना देत होता. त्यातील एक क्लिप मोबाईलवर व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी सदर पोलिसांनी महामेट्रोचे उप-महाव्यवस्थापक विश्वरंजन बवेरा आणि ऑपरेटर प्रवीण समर्थ यांच्याविरुद्ध आयटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्या तिघांना अटक केली आहे.