ETV Bharat / state

Nagpur Gang Rape: धक्कादायक! 15 वर्षीय तरुणीवर तब्बल सात नराधमांचा आळीपाळीनं सामूहिक बलात्कार; सर्व आरोपींना अटक - अल्पवयीन मुलावर बलात्कार

Gang Rape News : नागपूर सामूहिक बलात्काराच्या घटनेनं हादरलंय. 15 वर्षीय तरूणीवर सात नराधमांनी आळीपाळीनं बलात्कार केल्याची घटना घडलीय. आज सर्व आरोपींना अटक करण्यात आलीय.

Gang Rape News
सामूहिक बलात्कार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 10:48 PM IST

नागपूर Gang Rape News: अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना नागपूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीय. 15 वर्षीय तरुणीवर तब्बल सात नराधमांनी संगनमत करून आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणीच्या आईने या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.

अश्लील फोटो काढून त्रास : ही घटना 2 मार्च ते 26 सप्टेंबरच्या काळात घडलीय. धीरज हिवरकर (21), लकी धार्मीक (20) विकास हेडाउ (23), वेदु आवते(23), गोलु लिखार(25) लिलाधर चौरागडे, सुशिल धार्मिक, गौरव खुबाळकर, प्रणय टेकाडे, निखील धांदे, विक्की लिखार, स्नेहल सुरकार अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी पीडित मुलगीचा वारंवार पाठलाग करून तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी द्यायचे. आरोपी पीडितेचे अश्लील फोटो काढून तिला त्रास देत होते. (Khapa police station Nagpur)

आरोपींनी केला आळीपाळीने बलात्कार : मुख्य आरोपी धीरज हिवरकरनं तरूणीचे सर्व अश्लिल फोटो उर्वरित आरोपींच्या मोबाईलवर पाठवले. त्यामुळे इतर आरोपीदेखील तरुणीला त्रास देत होते. आरोपीने पीडित तरूणीला तिचे अश्लील फोटो दाखवुन भेटण्यास बोलावले होते. अश्लिल फोटो वायरल करण्याची धमकी देत तिच्यावर धीरज हिवरकर, वेदु आवते, लिलाधर चौरागडे, गोलु लिखार यांनी जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर निखील धांदे, गौरव खुबाळकर, सुशिल धार्मिक यांनी एका पाठोपाठ पिडीतेसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. तसेच लकी धार्मिक, विकास हेडाउ, विक्की लिखार, स्नेहल सुरकार, प्रणय टेकाडे यांनी पीडीतेचे मोबाईलमध्ये फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वारंवार त्रास दिला.

फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल : या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात आरोपींचे विरुध्द कलम 376 (2) (एन), 376 (ड), (डअ), 3534(अ), 354 (ड), 506 भादंवी सहकलम 4, 6, 11, 12 बालकांचे लैंगिक अपराधपासुन संरक्षण अधिनियम 2012 सहकलम 67, 67 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. माहीती तंत्रज्ञान अधिनीयम 2000 अंतर्गत कलमवाढ करण्यात आलीय. (Gang Rape in Nagpur)

हेही वाचा :

  1. Gang Rape Of Minor Girl: छत्रपती संभाजीनगरमध्ये चौदा वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; चार अटकेत दोघे फरार, आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश
  2. Patna Gang Rape: पाटण्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या
  3. Buldhana crime news : घाटात महिलेवर सामूहिक बलात्कार, वेळेवर कारवाई न झाल्याने आमदार संजय गायकवाड यांचा ठाण्यात ठिय्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.