ETV Bharat / state

नागपूरला भेडसावतेय पाणी संकट, १० जूनपर्यंतच पुरेल एवढा पाणीसाठा

नागपूर जिल्ह्यात पेंच तोतलाडोह, नवेगाव खैरी आणि खिंडसी या जलसाठ्यांद्वारे पाणीपुरवठा होतो. सध्या या तिन्ही जलाशयात ६७ मिमी. क्यूब एवढेच पाणी शिल्लक आहे. एकट्या नागपूर शहरात दैनंदिन व्यवहारासाठी २.७ मिमी क्यूब एवढे पाणी लागते.

author img

By

Published : Apr 21, 2019, 3:23 PM IST

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर - प्रत्येक उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. नागपूरलासुद्धा हा प्रश्न भेडसावत आहे. नागपूरला पाणीपुरवठा करणारी तीन जलाशये आहेत. पण, या तिन्ही जलाशयांतील पाणी १० जूनपर्यंतच पुरेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करण्याविषयी प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

नागपूर जिल्ह्यात पेंच तोतलाडोह, नवेगाव खैरी आणि खिंडसी या जलसाठ्यांद्वारे पाणीपुरवठा होतो. सध्या या तिन्ही जलाशयात ६७ मिमी. क्यूब एवढेच पाणी शिल्लक आहे. एकट्या नागपूर शहरात दैनंदिन व्यवहारासाठी २.७ मिमी क्यूब एवढे पाणी लागते. त्यापैकी १.३ मिमी क्यूब पाणी खापरखेडा आणि कोराडी औष्णिक विद्युत केंद्राला विजनिर्मितीसाठी तसेच, नगरपालिकांना पुरविण्यात येते.

पाणी संकटापासून वाचण्यासाठी पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळणे, सांडपाण्याचे योग्य नियोजन आदींबाबत प्रशासनाकडून जागृती करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही जनजागृती मोहिम राबवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.

Intro:उन्हाळा म्हटल्यावर सर्वत्र उनाचा तडाका सोबतच होणारी गर्मी.यामुळे आपण दुपारच्या सुमारास घरी थंड हवेसाठी कुलर, ए.सी चा वापर करतो.यासाठी लागत ते म्हणजे पाणी. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे पाणी देखील बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत आहे यामुळे सर्वत्र पाण्याचे संकट येत आहे.

Body:नागपूर जिल्ह्यात स्थिती काही दिवसानंतर अशी स्थिती येऊ शकते. सध्या नागपुर जिल्ह्यात प्रामुख्याने पेंच तोतलाडोह, नवेगाव खैरी व खिंडसी या तिन्ही जलसाठ्याद्वारे नागपूर जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यात येतो, सध्या या तिन्ही जलाशयात 67मिमी.क्यूब पाणी शिल्लक आहे. एकट्या नागपुर शहरात दैनंदिन व्यवहारात 2.7मिमी क्यूब पाणी वापरल्या जाते. त्यापैकी 1.3 मिमी क्यूब पाणी हे खापरखेडा व कोराडी औष्णिक विद्युत केंद्राला वीजनिर्मितीसाठी व इतर नगरपालिका यांना पुरविण्यात येते.

Conclusion:सध्याच्या परिस्थितीत यातिन्ही जलाशयामध्ये केवळ १०जून पर्यंत पाणी पुरेल इतके पाणी उपलब्ध आहे..पाणी संकटापासून वाचण्यासाठी योग्य रीतीने पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. तापमान वाढीमुळे पाण्याचे मोठया प्रमाणात बाष्पीभवन होतं असते. नागपूर महानगरपालिका यांच्या पाणी पुरवठा विभागाला पाण्याचा अपव्यय वापर,सांडपाण्याचे योग्य नियोजन, नवीन योजना करून जनजागृती करावी.अश्या प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.