नवी दिल्ली- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट आहे. भारतीय निवडणूक आयोग दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे.
भारतीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर होणार आहे. यापूर्वी निवडणूक आयोगानं सुरक्षा व्यवस्था आणि सणांमुळे महाराष्ट्रातील निवडणूक ही जम्मू काश्मीरच्या निवडणुकांबरोबर घेणं शक्य नसल्याचं म्हटलं होतं. निवडणुकीचे आज वेळापत्रक जाहीर होताच आचारसंहिताही लागू होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारला महत्त्वाच्या विकास कामांची आणि निर्णयांची घोषणा करता येणार नाही.
शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिलीच विधानसभा- राज्यातील 288 मतदासंघातील निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती विरोधात लढा असणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, भाजपा, शिवसेना शिंदे पक्ष हे महायुतीत आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना ठाकरे हे महाविकास आघाडीत आहेत. मनसे स्वतंत्र निवडणूक लढविणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणुका असणार आहे. या निवडणुकीच्या निकालावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे राजकीय भवितव्य पणाला लागणार आहे.
निवडणूक आयोगानं पारदार्शकपणं आणि निष्पक्षपणं निवडणुका घ्याव्यात. पोस्ट मतांमध्ये घोळ होतात. प्रत्येक मतदारसंघात 15 ते 20 कोटींचे वाटप करण्यात आले आहे. राज्यपाल घटनाबाह्य काम करतात. राज्यपाल नियुक्त ७ आमदारांची नावे घटनाबाह्य आहेत. निवडणुकीपूर्वी घाईघाईत शपथ घेतली जात आहे- शिवसेना खासदार संजय राऊत
- राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधकांनी राज्य सरकारला अनेकदा घेरलं आहे. दुसरीकडं महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांकरिता टोलमाफी अशा विविध योजना जाहीर करून महायुती सरकारनं जनतेला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठा फटका बसला होता. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा विधानसभा निवडणुकीत महायुतीला अपयश येऊ नये, यासाठी महायुतीच्या नेत्यांनी राजकीय वर्चस्व पणाला लावलं आहे.
भाजप आणि एनडीए महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांसाठी पूर्णपणे तयार आहे. आम्हाला विश्वास आहे हरियाणाप्रमाणेच, महाराष्ट्रही सत्तेच्या बाजूनं मतदान करेल. हेमंत सोरेन यांचे व्होट बँकेचे राजकारण आणि भ्रष्ट राजकारणामुळे झारखंडचे लोक हताश झाले आहेत. ते भाजपच्या नेतृत्वाखालील आदिवासींच्या बाजूनं असलेल्या सरकारला मतदान करण्यास उत्सुक आहेत. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राज्यांमध्ये भाजपचे सरकार येईल, असा विश्वास आहे.
- आगामी विधानसभा निवडणुकीत जेएमएमच्या नेतृत्वाखालील आघाडी झारखंडमधील सर्व 81 जागा लढविणार आहे. झारहखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ही सोमवारी माहिती दिली. हेमंत सोरेन यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांची तुरुंगात रवानगी झाली होती. त्यामुळे झारखंडमधील निवडणुकीत जनता काय कौल देणार याकडं संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.
झारखंड विधानसभेची निवडणूक आयोगाकडून तयारी- झारखंड राज्य विधानसभेची मुदत 5 जानेवारी 2025 रोजी संपुष्टात येणार आहे. राज्यभरातील 81 मतदारसंघांसाठी (44 सामान्य, 9 SC, 28 ST) निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाने 24 सप्टेंबर रोजी झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रांची येथे मतदान तयारीचा आढावा घेतला होता.
#WATCH | Delhi: On ECI to announce poll dates for Maharashtra & Jharkhand today, BJP national spokesperson, Pradeep Bhandari says, " bjp & nda is fully prepared for maharashtra and jharkhand elections. we are confident that like haryana, maharashtra will vote for a pro-incumbency… pic.twitter.com/AymT9QK2sa
— ANI (@ANI) October 15, 2024
महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी फक्त 17 जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या महाविकास आघाडीनं 30 जागा मिळवून अनेपेक्षितपणं विजय मिळवून महायुतीला धक्का दिला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं 105 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसनं 44 जागांवर विजय मिळविला होता. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी नियमानुसार राज्यात नवं सरकार स्थापन करावे लागणार आहे.
हेही वाचा-