ETV Bharat / state

जम्मुसाठी नागपुरातून विशेष श्रमिक रेल्वेगाडी सोडणार; विभागीय आयुक्त संजीव कुमार यांची माहिती

१४ मे रोजी जम्मू काश्मीर तसेच लडाख येथील नागरिक लॉकडाउनमुळे नागपूर आणि परिसरात अडकलेले आहेत. अशा नागरिकांसाठी श्रमिक स्पेशल रेल्वे सोडण्यात येणार असल्याची माहिती नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे.

author img

By

Published : May 10, 2020, 11:10 PM IST

जम्मुसाठी नागपुरातून विशेष श्रमिक रेल्वेगाडी सोडणार; विभागीय आयुक्त संजीव कुमार यांची माहिती
जम्मुसाठी नागपुरातून विशेष श्रमिक रेल्वेगाडी सोडणार; विभागीय आयुक्त संजीव कुमार यांची माहिती

नागपूर - राज्याच्या विविध जिल्ह्यात अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या राज्यात पोहचण्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली जात आहे. नागपुरातून उत्तर प्रदेशासाठी दोन ट्रेन सोडल्यानंतर आता १४ मे रोजी जम्मू काश्मीर तसेच लडाख येथील नागरिक लॉकडाउनमुळे नागपूर आणि परिसरात अडकलेले आहेत. अशा नागरिकांसाठी श्रमिक स्पेशल रेल्वे सोडण्यात येणार असल्याची माहिती नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे. ज्या श्रमिकांना या विशेष रेल्वेने जायचे असेल अशा नागरिकांनी आपली नावे नोंदवण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.

विभागीय आयुक्त संजीव कुमार
विभागीय आयुक्त संजीव कुमार

जम्मू येथे जाण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांना आपली नावे जिल्हाधिकारी यांच्या ईमेल वर collector. nagpur2020@gmail. com नोंदवावी लागणार आहेत. ऑनलाईन नाव नोंदविताना संपूर्ण नाव, लिंग, वय, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, सध्याचा पत्ता, जेथे जात आहात तेथील पत्ता आदी माहिती सादर करणे आवशयक आहे. जम्मू विशेष रेल्वेसाठी जिल्हाधिकारी, नागपूर येथील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अथवा नियंत्रण कक्ष क्रमांक 0712 2562668 यावर सुध्दा संपर्क साधता येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.