नागपूर - नुकतेच काही वृत्तमाध्यमांतर्फे एनसीआरबीचा अहवाल सांगण्यात आला. यामध्ये गुन्ह्यात नागपूर हे पाटण्यानंतर येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या अहवालातील आकडेवारीमध्ये तफावत आहे. हा अहवाल २०१९ चा आहे. नागपूरची जनसंख्या ही मधल्याकाळात २५ लाख होती. मात्र, त्यात कामठी आणि हिंगणा हे पोलीस स्टेशनसुद्धा समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे, एकून जनसंख्या ३० लाख इतकी झाली आहे. त्यामुळे, सदर अहवालातील महितीत तफावत असून नागपुरातील गुन्हेगारीत 15 टक्क्यांनी घट झाल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी चांगली कामगिरी केल्याबद्दल देशमुख यांनी नागपूर पोलिसांचे कौतुक केले. २०१९ मध्ये ९० गुन्हे दाखल झाले होते. तेच २०२० मध्ये ८८ गुन्हे दाखल झाले. २०१९ मध्ये भाग पाचमध्ये ७ हजार ७३४ गंभीर गुन्हे तर, २०२० मध्ये ६ हजार १९१ गुन्ह्याची नोंद झाली. यात दरोड्याच्या घटनांचा आकडा हा १५ वरून १९ झाला. जबरी चोरीचे १४७ गुन्हे होते. त्यात घट होत १२७ गुन्हे दाखल झाले आहेत. सोनसाखळी चोरीच्या घटनेत ६५ टक्क्यांनी घट झाली आहे. बलात्काराच्या घटना पाहाता मागील वर्षीच्या तुलनेत त्यात ४ टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
हेही वाचा - नागपूर जळीतहत्याकांड प्रकरणी प्रियकराला अटक
अपहरणाच्या घटनेत ४० टक्क्यांनी घट झाली आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या हत्यार कायद्यांतर्गत ५६२ गुन्हे दाखल झाले आहेत. क्रिकेट सट्टा असो की कत्तलखाना, जनावरांची अवैध तस्करी, अवैधरित्या दारू विक्री करणारे छोटे ठेले, कॉम्बिंग ऑपरेशन प्रकरणात आरोपींना जामीन मिळण्यास अटक लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
लवकरच नवीन उपक्रम....
नागपूर शहरात पेट्रोलिंसाठी १० स्कुटर शहर पोलिसांच्या ताफ्यात देण्यात आले आहेत. मुंबईत पेट्रोलिंगसाठी घोडेस्वारांचे पथक तयार करण्यात आले होते. या धर्तीवर आता नागपूरलासुद्धा अशा प्रकारचे पथक तयार केले जाणार आहे. शहरात वाहतूक पोलिसांना पहिल्या टप्प्यात २०० बॉडीवॉर्म कॅमेरे दिले जाणार आहेत.
हेही वाचा - नागपूर महामेट्रोचा रविवार स्पेशल.. प्रवाश्यांसाठी खाणे-गाण्यासह, शॉपिंगची मेजवानी