नागपूर - जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. मागील सोमवारी 100 पार होऊन मंगळवारी कोरोना बधितांची संख्या दोनशेच्या (200) घरात पोहोचली आहे. ( Nagpur Corona Update ) यासोबतच ओमायक्रॉनची रुग्णसंख्या 10 वरून आज 13 झाली आहे. ( Nagpur Omicron Update )
पालकमंत्री घेणार आढावा बैठक -
मुंबई, पुण्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. उपराजधानी नागपुरातही कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे. जून 2021 नंतर रुग्णसंख्या एका दिवसात 196 वर पोहचली आहे. यात सोमवार, मंगळवार या दोन दिवसांत 329 कोरोना बधितांची नोंद झाली आहे. 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत जे रुग्ण मिळून आले ती संख्या केवळ दोन दिवसात गाठली आहे. ही वाढती रुग्णसंख्या पाहता पालकमंत्री यांनी बुधवारी आढावा बैठक बोलावली आहे. ( Nitin Raut Review Meeting On Omicron Situation )
ओमायक्रॉनची संख्या वाढतीवर -
राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव होत असताना मागील काही दिवसात कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. ओमायक्रॉनचा झपाट्याने होणारा संसर्ग पाहता रुग्णसंख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. यातच नागपुरात मंगळवारी आलेल्या अहवालात तीन ओमायक्रॉनचे रुग्ण मिळून आले. त्यामुळे बाधितांची संख्या 10 वरून 13 झाली आहे.
हेही वाचा - Nagpur Covid Restriction : कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; जिल्हा प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईचे निर्देश
जिल्ह्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढत चालली आहे. यात 11 दिवसांमध्ये 757 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या आठवड्याची सुरुवात 132 रुग्ण मिळून 100 पार केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 196 रुग्ण बाधित मिळून आले आहे. 7 हजार 8 जणांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर 166 जण शहरात कोरोना पॉझिटिव्ह आले. ग्रामीण भागात 24 तर बाहेरील जिल्ह्यात 6 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर याबरोबरच जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर हा 2.9 टक्के आहे.
मागील 11 दिवसातील कोरोना बाधितांची आकडेवारी -
25 डिसेंबर 24 बाधित
26 डिसेंबर 32 बाधित
27 डिसेंबर 12 बाधित
28 डिसेंबर 44 बाधित
29 डिसेंबर 27 बाधित
30 डिसेंबर 28 बाधित
31 डिसेंबर 90 बाधित
1 जानेवारी 54 बाधित
2 जानेवारी 90 बाधित
3 जानेवारी 133 बाधित
4 जानेवारी 196 बाधित