ETV Bharat / state

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची संपत्ती ५ वर्षांत १४० टक्क्यांनी वाढली - नागपूर

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची संपत्तीत गेल्या पाच वर्षांत १४० टक्‍क्‍यांची वाढल्याचे समोर आले आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले, त्यासोबत जोडलेल्या शपथपत्रातून ही माहिती उघड झाली आहे. एवढेच नाही तर, नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या संपत्तीतदेखील लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे.

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी
author img

By

Published : Mar 26, 2019, 7:12 PM IST

नागपूर - केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची संपत्तीत गेल्या पाच वर्षांत १४० टक्‍क्‍यांची वाढल्याचे समोर आले आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले, त्यासोबत जोडलेल्या शपथपत्रातून ही माहिती उघड झाली आहे. एवढेच नाही तर, नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या संपत्तीतदेखील लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे.

भाजप सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून गडकरी ओळखले जातात. असे असताना त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांच्या काळात वेगवान १४० टक्क्यांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नितीन गडकरींची एकूण संपत्ती ६ कोटी ९ लाख इतकी आहे. यातील १ कोटी ९६ लाखांची संपत्ती त्यांना वडिलांकडून मिळाली आहे. सोमवारी नितीन गडकरी यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या आणि पत्नीच्या संपत्तीची माहिती सादर केली.

२०१३-१४ या काळात नितीन गडकरींचे वार्षिक उत्पन्न हे २.७ लाख इतके होते तर २०१७-१८ वर्षात नितीन गडकरींचे वार्षिक उत्पन्न ६.४ इतके आहे. तर दुसरीकडे त्यांच्या पत्नीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. २०१३-१४ मध्ये कांचन गडकरी यांचे वार्षिक उत्पन्न हे ४.६ लाख इतके होते तर २०१७-१८ या अर्थिक वर्षात त्यांचे उत्पन्न ४० लाखांवर गेले आहे. या शिवाय नितीन गडकरींच्या नावे एक फ्लॅट मुंबईच्या वरळी येथे असून २०१४ साली त्या फ्लॅटची किंमत ३.७८ कोटी होती, तर सध्याच्या बाजारभावानुसार तो फ्लॅट ४ कोटी २५ लाखांचा झाला आहे. या व्यतिरिक्त गडकरींच्याकडे २२ लाखांचे दागिने देखील आहेत. सर्व चल-अचल संपत्तीचा अहवाल सादर करताना नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

Intro:केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांच्या काळात 140 टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांनी नामनिर्देशित पत्र सादर केले त्यासोबत त्यांनी जोडलेल्या शपथपत्रात ही माहिती उघड झाली आहे.... एवढेच नाही तर नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या संपत्तीत देखील लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे

Body:केंद्र सरकारचे सर्वाधिक वेगवान मंत्री असल्याचा गौरव प्राप्त केलेले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संपत्तीत गेल्या पाच वर्षांच्या काळात वेगवान 140 टक्क्यांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.... नितीन गडकरींची एकूण संपत्ती 6 कोटी 9 लाख रुपये इतकी आहे यातील एक कोटी 96 लाखांची संपत्ती त्यांना वडिलांकडून मिळाली आहे.... काल नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा निवडणुकी करिता अर्ज दाखल केला आहे त्यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या आणि पत्नीच्या संपत्तीची माहिती सादर केलेली आहे.....2013- 14 या काळात नितीन गडकरी यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.7 लाख इतके होते तर 2017-18 वर्षात नितीन गडकरी यांचे वार्षिक उत्पन्न 6.4 इतके आहे....तर दुसरीकडे त्यांच्या पत्नीच्या उत्पन्नातही वाढ झालेली आहे....2013-14 या काळात कांचन गडकरी यांचे वार्षिक उत्पन्न हे 4.6लाख इतके होते तर 2017-18 या अर्थिक वर्षात त्यांचे उत्पन्न 40 लाखांवर गेले आहे....या शिवाय नितीन गडकरी यांच्या नावे एक फ्लॅट मुंबई च्या वरळी येथे असून 2014 साली त्या फ्लॅटची किंमत 3.78 कोटी रुपये होती तर सध्याच्या बाजारभावा नुसार तो फ्लॅट 4 कोटी 25 लाखांचा झाला आहे....या व्यतिरिक्त गडकरी उणच्याकडे 22 लाखांचे दागिने देखील आहेत.... सर्व चल अचल संपत्तीचा अहवाल सादर करताना नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.