ETV Bharat / state

नागपुरात आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपर फुटीचा आरोप - नागपूर आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका लीक न्यूज

राज्यात आरोग्य विभागातीन अनेक पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठी विभागाच्यावतीने परीक्षा घेण्यात आली. मात्र, नागपूरमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा काही परीक्षार्थींनी केला आहे.

Nagpur health department paper lea
नागपूर आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका लीक
author img

By

Published : Mar 1, 2021, 7:18 AM IST

Updated : Mar 1, 2021, 7:29 AM IST

नागपूर - राज्यभरात आरोग्य विभागातील 54 वेगवेगळ्या पदांसाठी रविवारी दोन सत्रात पेपर घेण्यात आला. यात नागपूरच्या जी एच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजातील केंद्रावर पेपर फुटल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे. याबाबत त्यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार करून पेपर रद्द करण्याची मागणी केली आहे.

जी एच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजातील केंद्रावर पेपर फुटल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला

रविवारी नागपूरसह राज्यात अनेक ठिकाणी आरोग्यसेवक, लॅब असिस्टंट अशा 54 वेगवेळ्या पदांच्या 3 हजार 277 हजार जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा दोन सत्रात झाली. दुपारच्या सत्रात पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी व्हिडीओ काढून केला आहे. हा व्हिडिओ नागपुरातील असल्याचे परीक्षार्थींनी सांगीतले आहे.

वर्गात येण्यापूर्वीच फुटला लिफाफा -

परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा वर्गात आणून, वर्गातील दोन परीक्षार्थींकडून त्याचे सील तपासण्यात येते. त्यानंतर लिफाफ्याचे सील फोडले जाते. त्या लिफाफ्यावर दोन परीक्षार्थींची सही देखील घेतली जाते. मात्र, आरोग्य विभागातील पेपर घेताना आलेल्या प्रश्नपत्रिका लिफाफ्याचे सील अगोदरच फोडलेले होते. प्रश्नपत्रिका एका प्लास्टिक पिशवीत गुंडाळलेल्या असल्याचे दाखवत पेपर फुटला, असा आरोप परीक्षार्थींनी केला आहे.

सील बंद लिफाफा केव्हा फुटला?

प्रश्नपत्रिकांचा लिफाफा हा अगोदर का फोडण्यात आला? केव्हा फोडण्यात आला आणि कोणाच्या फायद्यासाठी फोडण्यात आला यासह अनेक प्रश्न परीक्षार्थींनी उपस्थित केले आहेत. हा पेपर रद्द करण्याची मागणी व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आली आहे. नागपुरात घडलेला प्रकार इतरांना कळावा म्हणून आम्ही व्हिडिओ व्हायरल केल्याचे परीक्षार्थींचे म्हणणे आहे.

पोलीस आयुक्तांना दिली लेखी तक्रार -

परीक्षार्थींनी नागपूर पोलीस आयुक्तांना याबाबत लेखी तक्रार दिली. या तक्रारीत वेळेपूर्वीच प्रश्नपत्रिकांचे सील फोडण्यात आले. यावर आक्षेप घेतला असता दोघांना मारहाण केली असल्याचे सुद्धा नमूद केलेले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी विनंती पोलीस आयुक्तांना केली आहे.

Last Updated : Mar 1, 2021, 7:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.