ETV Bharat / state

अ‌ॅक्सिस बँक प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उच्च न्यायालयाची नोटीस - axis bank case

देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करत सरकारी कर्मचाऱ्यांचे खाते अ‌ॅक्सिस बँकेत वळविले, अशी आरोप करणारी याचिका मोहनिष जबलापुरे यांनी गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने आज सुनावणी करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली.

devendra fadnavis notice
माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस
author img

By

Published : Mar 5, 2020, 8:02 PM IST

नागपूर - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला आहे. पदाचा गैरवापर करून सरकारी कर्मचाऱ्यांचे खाते अ‌ॅक्सिस बँकेत वळविल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे.

माहिती देताना याचिकाकर्त्यांचे वकील सतीश उके

देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करत सरकारी कर्मचाऱ्यांचे खाते अ‌ॅक्सिस बँकेत वळविले, अशी आरोप करणारी याचिका मोहनिष जबलापुरे यांनी गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने आज सुनावणी करत फडणवीस यांना नोटीस बजावली. त्यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव, गृह विभागाचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनाही उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. न्यायालयाने तिघांनाही ८ आठवड्यात सदर प्रकरणी उत्तर मागितले आहे.

हेही वाचा- होळीच्या तोंडावर राज्य उत्पादक शुल्क विभाग सक्रिय, अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.