ETV Bharat / state

Nag River Project : नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प आठ वर्षात पूर्ण करण्याचे उद्धिष्ट;१९२७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित - Nag River Pollution Abatement Project

नागपूर शहरातील ऐतिहासिक नाग नदीच्या पुनरूज्जीवन प्रकल्पाच्या पायाभरणी पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाली होती. नाग नदीला नवे जीवन देणा-या ४१ किमी लांबीचा प्रकल्प १ हजार ९२७ कोटींचा अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे काम पुढील वर्षात पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात या प्रकल्पाला केन्द्रीय मंत्रीमंडळाने मंजूरी दिली होती. प्रकल्पाचा आराखडा आयआयटी रुडकीच्या तज्ज्ञांनी तयार केला असून नागनदीच्या काठावर वॉकिंग ट्रॅक त्यावर आकर्षक विद्युत व्यवस्था केली जाणार आहे.

Nag River Project
नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प
author img

By

Published : Jan 21, 2023, 9:18 PM IST

नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प

नागपूर : शहराला ऐतिहासिक ओळख मिळवून देणाऱ्या नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. नाग नदीला नवे जीवन देणा-या ४१ किमी लांबीचा प्रकल्प १ हजार ९२७ कोटीचा अपेक्षित आहे. या प्रकल्पाची पायाभरणी गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्वाकांक्षी नाग नदी प्रकल्पाचे काम ८ वर्षात पूर्ण होईल असा अंदाज आहे. नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला १९२७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा खर्च फ्रान्स सरकार करणार आहे.

ऑक्टोबरमध्ये सुरू होणार काम : नागपूर शहराची ओळख असलेल्या नाग नदीत शहरातील सर्व भागातून आलेले गडर लाईनचे पाणी वाहून नेले जात आहे. त्यामुळे नाग नदीने स्वतःचे अस्तित्व हरवत होती. त्यामुळे नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पांतर्गत सर्वात आधी मलनिस्सारण वाहिन्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात सल्लागारांची नियुक्ती केली जाईल. ऑक्टोबर महिन्यात नागनदी सौंदर्यीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होण्याचा अंदाज आहे.

1 हजार 927 कोटींचा प्रकल्प : नाग नदी प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील जवळपास ५०० किमी सिवरलाईन नेटवर्कचे नूतनीकरण करण्यात येईल. या प्रकल्पाचा एकूण खर्च 1 हजार 927 कोटी एवढा आहे. प्रकल्पामध्ये केंद्र शासन, राज्य शासन आणि नागपूर महानगरपालिका यांची भागीदारी असेल. यामध्ये केंद्र सरकारचा वाटा हा 60 टक्के असेल तर राज्य सरकार 25 टक्के भार उचलणार आहे, नागपूर महानगरपालिकेला 15 टक्के खर्च करावा लागणार आहे. त्यानुसार केंद्र शासनाकडून 1 हजार 115.22 कोटी राज्य शासनाकडून 507.36 कोटी तसेच मनपाकडून 15 टक्के म्हणजे 304.41 कोटी खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 131861 घरांना सीवर नेटवर्कमध्ये जोडण्यात येणार आहे.

नागपूर महानगरपालिकेची जबाबदारी : नाग नदी प्रदूषण निर्मूलन आणि पुनरूज्जीवन प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगर पालिकेकडे आहे. यासाठी नदीत येणारे सांडपाणी अडविणे किंवा ते वळविणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र तयार करणे, प्रसाधनगृह आदी कामे प्रकल्पांतर्गत होणार आहेत. नागपुरकरांसाठी महत्वपूर्ण ठरणारा आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा प्रकल्प आहे.

नागपूर शहराचा बदलता चेहरा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरचे बदलते स्वरूप डोळे दिपणारे आहेत. भरतातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारे शहर म्हणून नागपूरचा उल्लेख केला जाऊ लागला आहे. लांबच लांब उड्डाण पूल, दुमजली, तीन मजली मेट्रोचे पुलं लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसे आहेत. सोबतच शहराला दर्जेदार रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे.

नाग नदीमुळे ओळख : नागपूर शहराची ओळख असलेली नाग नदीला फारचं बिकट परिस्थितीत आहे. एकेकाळी ही नदी नागपूरची ओळख होती. एवढंच नाही तर नाग नदीत धार्मिक कार्य देखील पार पाडली जायची.

नदीला आले गटाराचे स्वरूप : नागनदीला शहरातील लहान- मोठे २३५ नाले येऊन मिळतात. यांत पिवळी नदी, हत्ती नाला, सत्ती नाला, गड्डीगोदाम नाला, बाळाभाऊपेठ नाला, बुरड नाला, बोरियापुरा नाला, डोबीनगर नाला, लाकडीपूल नाला,तकिया नाला व नरेंद्र नगर नाला या मोठ्या नाल्यांचा समावेश होतो. सर्व नाल्यांचे घाणेरडे पाणी नदीत सोडल्यामुळे नाग नदीला गटाराचे स्वरूप आले आहे. त्यामुळे एकूण १७ किलोमीटर लांबीची ही नदी आता जवळजवळ मृतप्राय झाली होती. मात्र, आता या नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्‍न सुरू झाल्यामुळे नाग नदीला पूर्वीचे वैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

प्रकल्पातील प्रमुख मुद्दे :

  • अंबाझरी तलावातून नाग नदी उगम पावते.नाग नदीची एकूण लांबी ६८ किमी आहे.
  • शहरी भागात नाग नदीची लांबी १५.६८ किमी आहे.
  • नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत नवे ‘एसटीपी’ (९२ एमएलडी) तयार करण्यात येतील.
  • ‘एसटीपी’ (१० एमएलडी) अद्ययावत (अपग्रेडेशन) करण्यात येईल.
  • नविन 4 पम्पींग स्टेशन.
  • प्रकल्पामध्ये १०७ ‘मॅनहोल’ वळण (मॅनहोल डायव्हर्सन)
  • ४८.७८ किमी इंटरसेप्टर सीवर (नाग नदी व पिवळी नदी वर)
  • उत्तर झोन मध्ये 247.9 किमी सीवर लाईन तसेच मध्य झोन मध्ये 211.60‍ किमी सीवर लाईन बदलण्यात येतील.
  • प्रकल्प झाल्यानंतर नाग नदी, बोरनाला आणि पिवळी नदीचा पाण्याची गुणवत्ता सुधरेल.
  • प्रकल्प वर्ष 5 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
  • शहराचा स्वच्छतेमध्ये सुधारणा होईल.
  • नदयांच्या पाण्यात प्रदुषणाचे स्तर कमी होतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.