ETV Bharat / state

केंद्राच्या नव्या मंत्रिमंडळात नितीन गडकरींना कोणते मंत्रालय मिळणार,नागपूरकरांमध्ये उत्सुकता - निकाल

गेल्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि हंसराज अहिर मंत्री होते. या निवडणुकीत नितीन गडकरी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असले तरी चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर हे पराभूत झाले आहेत त्यामुळे विदर्भातून कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल याकडे सुद्धा वैदर्भीय जनतेचे लक्ष लागलेले आहे.

गडकरींना कोणते मंत्रालय मिळणार
author img

By

Published : May 25, 2019, 3:30 PM IST

नागपूर - १७ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशात आणि राज्यात घवघवीत यश मिळाले. त्यानंतर शुक्रवारी १६वी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस राष्ट्रपतीकडे करण्यात आली. आता बहुमताने विजयी झालेल्या भाजपच्या नवीन सतेत्त नागपूर लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार नितीन गडकरी यांच्याकडे कोणते मंत्रालय सोपवले जाणार याबाबत जोरदार तर्क वितर्क लढवले जात आहेत. अनेकांच्या मते गडकरींच्या कोणत्याही मंत्रालयात बदल केला जाणार नाही, तर काहींना गडकरींचे प्रमोशन होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

गडकरींना कोणते मंत्रालय मिळणार

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता नवीन सरकार स्थापनेचे वेध लागलेले आहेत. शुक्रवारी केद्रींय कॅबिनेटची बैठक झाली. त्यात १६ वी लोकसभा भंग करण्याचा निर्णय झाला आहे. ३० मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवीन सरकारची स्थापना होणार आहे. मात्र, या नवीन मंत्रिमंडळात कोणत्या खासदारांची वर्णी लागेल यावरून जनमानसात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि हंसराज अहिर मंत्री होते. या निवडणुकीत नितीन गडकरी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असले तरी चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर हे पराभूत झाले आहेत त्यामुळे विदर्भातून कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल याकडे सुद्धा वैदर्भीय जनतेचे लक्ष लागलेले आहे.

गेल्या सरकारमध्ये नितीन गडकरी यांच्याकडे ट्रान्सपोर्ट, शिपिंग, गंगा सफाई सारखे महत्वाचे मंत्रालये होती. त्यावेळी गडकरींनी सर्वच मंत्रालयाच्या कामात आपली छाप सोडली आहे. त्यामुळे या नवीन सरकारमध्ये त्यांचे मंत्रालय बदलले जाण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यासह आणखी एखादे नवीन मंत्रालय देखील गडकरींना मिळू शकेल. अथवा त्या बदल्यात गडकरींकडील एखादे मंत्रालय कमी देखील केले जाऊ शकते, असे तर्क राजकीय पटलासह जनमानसात लावले जात आहेत.

Intro:केंद्र सरकार मध्ये नितीन गडकरी कडे कोणते मंत्रालय असतील या संदर्भात जोरदार तर्क वितर्क लढवले जात आहेत....अनेकांच्या मते गडकरींच्या कोणत्याही मंत्रालयात बदल केला जाणार नाही ,तर काहींना गडकरींचे प्रमोशन होणार असे वाटू लागले आहे

Body:लोकसभा निवडणुकीच्या निकालाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता नवीन सरकार स्थापनेचे वेध लागलेले आहेत....कालच कॅबिनेटची बैठक झाली त्यात16 वी लोकसभा भंग करण्याचा निर्णय झाला आहे...30 मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवीन सरकारची स्थापना होणार असली तरी मंत्रिमंडळात कोणत्या खासदारांची वर्णी लागेल या संदर्भात जनमानसात जोरदार चर्चा सुरू झाली आहे...गेल्या सरकार मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या विदर्भातून नितीन गडकरी आणि हंसराज अहिर मंत्री होते...नितीन गडकरी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असले तरी चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर हे पराभूत झाले आहेत त्यामुळे विदर्भातून कुणाच्या गळयात मंत्रिपदाची माळ पडेल या कडे सुद्धा वैदर्भीय जनतेचे लक्ष लागलेले आहे....गेल्या सरकार मध्ये नितीन गडकरी यांच्याकडे ट्रान्सपोर्ट,शिपिंग,गंगा सफाई सारखे महत्वाचे मंत्रालय असताना गडकरींनी सर्व मंत्रालयाच्या कामात आपली छाप सोडली आहे,त्यामुळे या नवीन सरकार मध्ये त्यांचे मंत्रालय बदलले जाण्याची शक्यता कमी असली तरी आणखी एखादे नवीन मंत्रालय देखील गडकरींना मिळू शकेल...अर्थात त्या बदल्यात गडकरींकडिल एखादे मंत्रालय कमी देखील केले जाऊ शकते.... येत्या 30 मे रोजी नवीन सरकारचे गठन होणार असून नितीन गडकरींना कोणते पोर्टपोलिओ मिळतो या कडे नागपूरकर मोठ्या आशेने बघतोय

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.