ETV Bharat / state

नागपूर शहर रेड झोनमध्येच, राज्य शासनाकडून नवीन आदेश जारी

राज्य शासनातर्फे १९ मे रोजी देण्यात आलेल्या आदेशामध्ये नागपूरला रेड झोनमधून वगळण्यात आले होते. मात्र, शहरात वाढते कोरोनाचे रुग्ण आणि त्यामुळे संसर्गाचा धोका लक्षात घेता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नागपूरला रेड झोनमध्येच ठेवण्याची विनंती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्य शासनाला केली होती.

maharashtra government
नागपूर शहर रेड झोनमध्येच, राज्य शासनाकडून नवीन आदेश जारी
author img

By

Published : May 22, 2020, 11:27 AM IST

नागपूर - महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाऊन संदर्भात नवीन आदेश देण्यात आले आहे. नवीन निकषांनुसार नागपूर शहर रेड झोनमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे आदेश २२ मे पासून अंमलात येणार आहेत. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रेड झोन संबंधीचे आदेश लागू राहतील, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

राज्य शासनातर्फे १९ मे रोजी देण्यात आलेल्या आदेशामध्ये नागपूरला रेड झोनमधून वगळण्यात आले होते. मात्र, शहरात वाढते कोरोनाचे रुग्ण आणि त्यामुळे संसर्गाचा धोका लक्षात घेता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने नागपूरला रेड झोनमध्येच ठेवण्याची विनंती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्य शासनाला केली होती. त्यानुसार गुरूवारी रात्री उशीरा निर्गमीत करण्यात आलेल्या आदेशामध्ये नागपूर शहर रेड झोनमध्ये कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, शहरात खासगी कार्यालये बंद राहणार आहेत. तर अत्यावश्यक सेवेशी संबंधित शासकीय/निमशासकीय कार्यालये वगळता इतर शासकीय कार्यालयांमध्ये केवळ ५ टक्केच कर्मचारी उपस्थित राहू शकतील. नवीन आदेशानुसार शहरात सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू राहणार असून अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांच्या आवागमनावर बंदी राहणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘नाईट कर्फ्यू’च्या काटेकोर पालनासंबंधी पोलीस प्रशासनालाही आदेश दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागातर्फे कारवाई केली जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.