नागपूर - झोपण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीची ( Murder In Khadgaon ) हत्या झाल्याची खळबळजनक घटना नागपूर शहरातील वाडी पोलीस ठाण्याच्या ( Nagpur Wadi Police Station ) हद्दीतील खडगाव येथे घडली आहे. संतोष तुकडोजी दिघोरे (३२) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी वैभव देशमुखचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. वैभव हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पुढे आली आहे.
अशी झाली हत्या -
मृतक संतोष दिघोरेला दारूचे व्यसन होते. तो काल रात्री तो दारू प्यायलानंतर खडगाव येथील बक्षी लेआउट मधील नरेश ट्रान्सपोर्टच्या कार्यालया जवळ दारूच्या नशेत झोपला होता. त्याच वेळी वैभव देशमुख नावाचा तिथे आला. त्याला देखील तिथेच झोपायचे आल्याने त्याने संतोषला अन्य दुसऱ्या ठिकाणी जाऊन झोपण्यास सांगितले. मात्र, संतोषला दारू अधिक झाल्याने त्याने मंगेशच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे संतापलेल्या मंगेशने संतोषला मारहाण केली. एवढचं नाही तर तिथे पडलेले दगड विटा सुद्धा फेकून मारले. यामध्ये संतोष गंभीर जखमी झाला होता. आज सकाळी परिसरातील नागरिकांना संतोष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आल्यानंतर स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी संतोषला तापसून मृत घोषित केले. घटनेची माहिती समजताच वाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होते. मात्र, तोपर्यंत आरोपी मंगेश पळून गेला असल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
दारूने केलं वाटोळं -
संतोष हा दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याची पत्नी दोन मुलांना घेऊन वेगळी राहत होती. संतोषच्या मोठ्या भावाने त्याला आसरा दिला होता. संतोष ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये मजुरीचे काम करायचा. त्यातून मिळाळलेला पैशाची तो दारू पीत होता. दारूमुळे त्याचे हसते खेळते कुटुंब विस्कळीत झाले होते. तर त्याचा अंतदेखील दारू मुळेच झाला असल्याची चर्चा वाडी परिसरात आहे.