ETV Bharat / state

Asaduddin Owaisi : संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन 'यांनी' करावे, पहा काय म्हणाले ओवैसी - संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन

लोकसभा अध्यक्ष लोकसभेचे कस्टोडीयन असतात. त्यामुळे संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्तेच झाले पाहिजे, असे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.

Asaduddin Owaisi
असदुद्दीन ओवैसी
author img

By

Published : May 27, 2023, 5:51 PM IST

असदुद्दीन ओवैसी

नागपूर : संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यावरून सध्या देशात गदारोळ सुरु आहे. एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी यावर आता आपले मत व्यक्त केले आहे.

'लोकसभा अध्यक्षांनी उद्घाटन करावे' : ओवैसी म्हणाले की, 'नव्या संसदेच्या कामाचे शिलन्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर नॅशनल एम्बलमचे उद्घाटनही त्यांनीच केले होते. आता ही तिसरी वेळ असेल जेव्हा संसदेचे उद्घाटन करायला पंतप्रधान चालले आहेत. लोकसभा अध्यक्ष लोकसभेचे कस्टोडीयन असतात. पंतप्रधान त्यांच्या अधिकारात इंटरफेअर करत आहेत. हा अधिकार लोकसभा अध्यक्षांचा आहे. त्यामुळे उद्घाटन देखील लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्तेचं झाले पाहिजे.'

'नव्या संसदेचा मुद्दा मीच उचलला होता' : ओवैसी पुढे म्हणाले की, देशाला नव्या संसद इमारतीची गरज आहे हे मी 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सर्वपक्षीय मिटिंग झाली होती तेव्हाचं सांगितले होते. वोट ऑफ कॉन्फिडन्स किंवा इतर कार्यक्रम होतात तेव्हा लोकसभेची जागा अपुरी पडते म्हणून नव्या संसदचा मुद्दा मी उचलला होता. राहिला प्रश्न उद्घाटन कुणी करावे, तर हे स्पष्ट आहे की उद्घाटन हे लोकसभा अध्यक्षांनीच करायला पाहिजे कारण ते लोकसभेचे संरक्षक आहेत.

'पक्षाच्या कामासाठी नागपूर दौरा' : मी पक्षाच्या कार्यक्रमासाठी नागपूरात आले आहे. पक्षाला मजबूत करणे हे आमचे काम आहे. त्यासाठी आलो असल्याचे ओवैसी म्हणाले. प्रत्येकाला आपापल्या पक्षाचं काम करण्याचा अधिकार आहे असे ते म्हणाले. ज्यावेळी निवडणुका येतील तेव्हा सांगू की आम्ही कोणासोबत गटबंधन करू. महाराष्ट्रात जर कोणी आमच्यासोबत यायला इच्छुक नाही तर काही हरकत नाही, अल्ला आमच्या सोबत आहे, असे ते म्हणाले.

'पंतप्रधानांनी मन मोठे करावे' : लोकसभेत पंतप्रधान नाही तर लोकसभा अध्यक्ष मोठे असतात. म्हणूनच लोकसभा सचिवालय वेगळं असतं. लोकसभा लेजिस्ट्रेचरचा भाग आहे. पंतप्रधान सगळीकडे जातात, त्यांचं नाव फाउंडेशन स्टोनवरही आलं आहे. त्यामुळे ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन केले तर काही आभाळ नाही कोसळणार. पंतप्रधानांनी मन मोठे करावे, असे ओवैसी म्हणाले आहेत.

'केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाने उत्तर द्यावे' : जेव्हा कश्मीर मधून 370 कलम हटवल्या गेलं होतं, तेव्हा आम आदमी पक्ष आणि केजरीवाल समर्थनात उभे राहिले होते. पण आज ते का रडत आहेत? तेव्हा त्यांना काही वाटलं नव्हतं की एका राज्याला युनियन टेरिटरी बनवण्यात आलं आहे. अरविंद केजरीवाल हे सॉफ्ट हिंदुत्व नाही तर रियल हिंदुत्व फॉलो करतात. ते स्वतःला भाजपपेक्षा मोठे हिंदुत्ववादी सिद्ध करायला गेले, मात्र आता रडत आहेत, असे ओवैसी म्हणाले.

हेही वाचा :

  1. Complaint Against Kejriwal Kharge : आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केजरीवाल, खरगे यांच्या विरोधात तक्रार दाखल
  2. New Parliament Building : अशी आहे संसदेची नवी इमारत! पहा Video
  3. New Parliament Building Inauguration : नवीन संसद भवन उद्घाटन प्रकरणी याचिकाकर्त्याला दणका, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.